गुहागर, ता. 16 : शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, याची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी, तसेच १६ रोजी भाजपचे माजी खा. निलेश राणे यांची सभा होत असून या सभेवर लक्ष ठेवून प्रक्षोभक भाषणाची व अन्य वाक्यांची भाषणांची पडताळणी करून उचित कारवाई करावी, या मागणीचे निवेदन गुरुवारी गुहागर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने गुहागर पोलीस स्थानकाला देण्यात आले. Statement by Shiv Sena Thackeray group to police station
या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडीवर सध्याच्या महाराष्ट्र शासनाकडून होत असलेला अन्याय सत्तेचा दुरूपयोग करून मविआच्या नेत्यांवर होत असलेली चुकीची कारवाई त्याच्याविरोधात आ. श्री. भास्करराव जाधव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. सुमारे ४० वर्ष समाजकारण व राजकारणामध्ये काम करताना स्वतःची आक्रमक अशी शैली असतानादेखील गुहागर तालूका, रत्नागिरी जिल्हा किंवा कोकणासह महाराष्ट्रामध्ये कुठेही स्वतःच्या वक्तव्यामुळे आ. जाधव यांनी सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. Statement by Shiv Sena Thackeray group to police station
गेले काही दिवस केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे पुत्र आमदार श्री. नितेश राणे व दुसरे पुत्र श्री. निलेश राणे हे महाविकास आघाडीवर टीका करत असतानाच आमचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख श्री. उदधव ठाकरे आणि आमचे नेते आ. भास्करराव जाधव यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जावून टीका करीत आहेत. तसेच श्री. जाधव यांना ठेचून काढू, मारून टाकू, चोप देऊ, गाडून टाकू अशा प्रकारची वक्तव्य ही राणे पिता- पुत्रांकडून इलेक्टॉनिक मिडिया, सोशल व प्रिंट मिडीयामधून प्रसारित होत आहेत. तसेच त्यांच्या काही गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांकडून येत्या काही दिवसांमध्ये आ. जाधव यांच्या घरावर, कार्यालयावर व त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला करण्याचे नाक्यानाक्यावर चर्चा करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर शुकवार दि. १६ फेब्रु. रोजी निलेश राणे हे श्री. भास्करराव जाधव यांचा मतदारसंघ असलेल्या गुहागरमध्ये येत असून त्यांचा येण्याचा मार्गदेखील आमच्या साहेबांच्या घर व कार्यालयावरून जातो. ते यावेळी आपल्यासोबत अनेक गाडयांमधून गुंडांना आपल्यासोबत घेवून येणार असल्याचेदेखील वृत्त आहे आणि त्यासंदर्भात तसे टीझरही विविध माध्यमांमधुन प्रसारितही झाले आहेत. Statement by Shiv Sena Thackeray group to police station
आ. जाधव यांच्या भ्रमणध्वनीवर गेले २-३ दिवस अज्ञाताकडून धमक्यांचे फोन येत असून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. गुहागर येथे होणा-या निलेश राणे यांच्या सभेला आपण प्रतिबंध करावा. आ. जाधव यांच्याविरोधात प्रसारित होत असलेली वैयक्तिक पातळीवरची हीन वक्तव्ये, जाहीर धमक्या, भ्रमणध्वनीवर येणा-या धमक्या व नाक्या-नाक्यावर अनेक गुंडांकडून त्यांना मारहाण करणार असल्याच्या होत असलेल्या चर्चा या सर्व पार्श्वभुमीवर आ. जाधव यांना तसेच त्यांच्या कार्यालय व घराला भक्कम अशी सुरक्षा देणे हे आपले काम असून तशी सुरक्षा त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. तसे न होता आ. भास्करराव जाधव यांना कोणतीही इजा झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस खात्यावर असेल,असा इशारा देण्यात आला आहे. Statement by Shiv Sena Thackeray group to police station
यावेळी तालुकाप्रमुख सचिन बाईत, सचिव विलास गुरव, उप तालुकाप्रमुख विलास वाघे, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी जि. प. सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, राज विखारे, सारिका कनगुटकर, आरे सरपंच सामित घाणेकर, प्रवीण रहाटे, सिद्धीविनायक जाधव, सुधाकर सांगळे, पारिजात कांबळे, अंकुश माटल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. Statement by Shiv Sena Thackeray group to police station