गुहागर नगरपंचायत व जिल्हा शलचिकिस्तक रत्नागिरी यांना
गुहागर, ता. 13 : गुहागर मनसेच्या वतीने गुहागर नगरपंचायत व गुहागर ग्रामीण रुग्णालय, जिल्हा शलचिकिस्तक रत्नागिरी यांना विविध मागण्यांसाठी गुहागर मनसे शहराध्यक्ष नवनाथ साखरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनमार्फत निवेदन देण्यात आले. Statement by MNS for various demands
गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील स्ट्रीट लाईट काही दिवस बंद अवस्थेत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने ते त्वरित चालू करावेत. तसेच व्याघ्रंबरी मंदिरापासून ते स्मशानभूमीवरील रस्त्याची अवस्था फार बिकट झालेली दिसून येत आहे. या मार्गावर अंत्ययात्रा तसेच गणपती विसर्जनासाठी सुद्धा याच रस्त्याचा वापर केला जातो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, असे निवेदन गुहागर नगरपंचायत कर्मचारी जनार्दन साटले यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच गुहागर ग्रामीण रुग्णालय येथील प्रयोगशाळा सहाय्यक रणजीत किल्लेकर यांची बदली दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा गुहागर ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती करावी, म्हणून गुहागर ग्रामीणचे डॉक्टर सागर हलगे, कर्मचारी दीपक मांजरेकर, एस. ससाणे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. Statement by MNS for various demands
हे निवेदन देताना मनसे शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, उपशहराध्यक्ष राजा कदम, प्रज्ञा कदम, नंदकुमार जांगळी, वीरेंद्र शेटे, दत्ताराम गिजे, विराज बेंडल शाखाध्यक्ष गणेश गीजे, अभिजीत रायकर, राहुल बावधनकर, गणेश पारकर, दिलीप नार्वेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. Statement by MNS for various demands