डांसांच्या वाढत्या प्राधुर्रभाव रोखण्यासाठी किटकनाशक फवारणी करण्याबाबत
गुहागर, ता. 26 : नगरपंचायत कार्यक्षेत्रात वाढत्या डांसांच्या प्राधुर्रभाव व साथींच्या रोगांचा प्रसार कमी व्हावा. यासाठी नगर पंचायत गुहागर यांस भारतीय जनता पार्टी (BJP) गुहागर तर्फे निवेदन देण्यात आले. संपूर्ण नगरपंचायत कार्यक्षेत्रात व शासकिय दवाखाना येथे किटकनाशक फवारणी, (फॅगींग) लवकरात लवकर करण्यात यावी, असे निवेदनात सांगण्यात आले आहे. हे निवेदन नगरपंचायतचे श्री पेड़ांबकर साहेब यांनी स्विकारले. Statement by BJP to Nagar Panchayat

सध्या साथींच्या रोगांचा प्रसार खुपच वाढत आहे. त्यामुळे नगरपंचायत गुहागर यांस भारतीय जनता पार्टी गुहागर तर्फे निवेदन देण्यात आले. त्यावेळी श्री पेड़ांबकर साहेबांनी उद्यापासुन कामला सूरुवात होईल, असे आश्वासन दिले. यावेळी भारतीय पार्टीचे नगरसेवक श्री. समीर घाणेकर, स्वि. नगरसेवक श्री संजय मालप, भाजपा शहरअध्यक्ष श्री संगम मोरे, भाजपा युवामोर्चा शहरअध्यक्ष श्री मंदार पालशेतकर यादि उपस्थित होते. Statement by BJP to Nagar Panchayat
