• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

by Guhagar News
February 7, 2025
in Ratnagiri
93 1
1
182
SHARES
520
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 07 : राज्य युवा पुरस्कार 2023-24 साठी 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्तांनी केले आहे. State Youth Award

राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठया संख्येने युवा वर्ग / संस्था राज्यात  सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार शासन निर्णय दि. १२ जानेवारी २०१३ नुसार देण्यात येतात. सन २०२३-२४ या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप युवक-युवती यांना रोख रु.५०,०००/- संस्थेस रु.१,००,०००/- तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे. State Youth Award

राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांची गत तीन वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज दि. 15 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे. State Youth Award

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarState Youth AwardUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share73SendTweet46
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.