राज्यमंत्री पटेल; दुर्गादेवी मंदिरात ग्रामस्थांबरोबर संवाद
गुहागर, ता. 07 : शहराचा सीआरझेडचा विषय केंद्र सरकार नक्की मार्गी लावेन. असे आश्र्वासन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी गुहागरच्या ग्रामस्थांना दिले. जल जीवन मिशनच्या आढाव्यानंतर राज्यमंत्री पटेल यांनी श्री व्याडेश्र्वर व श्री दुर्गादेवीचे दर्शन घेतले. यावेळी दुर्गादेवी मंदिरात गुहागरमधील ग्रामस्थांबरोबर त्यांनी संवाद साधला. State Minister Patel interacted with Guhagar villagers
गुहागर वरचापाट येथील दुर्गादेवी मंदिरात शहरवासीयांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष व भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे यांनी सांगितले की, सीआरझेडमुळे स्थानिकांना जुन्या घरांचे पुर्नबांधणीमध्ये अडचणी येत आहेत. घर दुरुस्तीसाठी नगरविकास, एमसीझेडएमएकडे पाठपुरावा करणे सामान्य जनतेच्या कुवतीबाहेरचे आहे. 840 ग्रामस्थांना सीआरझेडच्या उल्लंघनाबाबत नोटीसा पाठवलेल्या असून शासनाकडून कायद्याचा धाक दाखवला जातो. पर्यटन दृष्ट्या विकसीत होणाऱ्या शहरात पर्यटन व्यावसायिकांची मुस्कटदाबी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. State Minister Patel interacted with Guhagar villagers
या विषयाबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री पटेल म्हणाले की, या संदर्भात ऑगस्ट महिन्यात आपण दिलेले निवेदन या विषयाचे केंद्रीय मंत्री भुपेंद्र सींह यांच्याकडे पाठवले आहे. हा प्रश्र्न लवकरात लवकर सोडवला जावा यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. महाराष्ट्राला 730 किलोमिटरचा समुद्रकिनारा आहे. त्यामुळे सर्वंकष विचार करुन केंद्र सीआरझेडबाबत जनतेच्या भावनांचा विचार करुन निर्णय घेईल. गुहागरमधील भाजपच्या निवडक पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क करुन दिल्लीत यावे. तेथे सीआरझेड संदर्भातील मंत्री भुपेंद्र सिंह आणि काही अधिकारी यांच्यासोबत आपण थेट चर्चा करु. State Minister Patel interacted with Guhagar villagers
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा जनतेचा पक्ष आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठीच केंद्र आणि सध्याचे राज्य सरकार प्राधान्याने काम करत आहे. देशात अनेक ठिकाणच्या समस्या कशा सोडविल्या जातात, मोदी सरकार कसे काम करते याची माहिती मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांचा दर रविवारी होणारा मन की बात हा कार्यक्रम सर्वांनी आवर्जुन पहावा. State Minister Patel interacted with Guhagar villagers
यावेळी गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, उत्तर रत्नागिरी भाजपचे कार्याध्यक्ष केदार साठे, गुहागरचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. State Minister Patel interacted with Guhagar villagers