• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सतिश मुणगेकर यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार

by Ganesh Dhanawade
January 30, 2023
in Guhagar
59 1
0
State level teacher award to Satish
117
SHARES
333
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील झोबंडी नं. १ प्रशालेचे उपक्रमशिल, तंत्रस्नेही उपशिक्षक सतिश मुणगेकर यांना नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समूहातर्फे अभिनव उपक्रमांसाठी उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्र सेवादलाचे निळू फुले सभागृह, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. State level teacher award to Satish

राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या ‘नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून संपादक देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला. महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या “नवी दिशा नवे उपक्रम” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यकम नुकताच राष्ट्र सेवादलाचे निळू फुले सभागृह सानेगुरुजी स्मारक सिंहगड रोड पुणे येथे संपन्न झाला. या पुस्तकात सतिश मुणगेकर यांच्या “माझे स्वनिर्मित ॲप” या नवोपक्रमाचा समावेश आहे. State level teacher award to Satish

या कार्यक्रमसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक रमाकांत काठमोरे, माजी उपसंचालक विकास गरूड, उपप्रशासकीय अधिकारी पुणे म.न.पा. शुभांगी चव्हाण, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर, विजय आवारे, शिवाजी खांडेकर संचालक राष्ट्र सेवा दल पुणे, सचिन डिंगळे, बाळकृष्ण चोरमले, राजेश सुर्वे, सेवानिवृत्त शिक्षिका विजया महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. सतिश मुणगेकर यांच्यावर राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. State level teacher award to Satish

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarState level teacher award to SatishUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share47SendTweet29
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.