गुहागर, ता. 10 : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता वर्ष २०२४ चे औचित्य साधून राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी केळकर शिक्षण संस्थेच्या विनायक गणेश वझे महाविद्यालय मुलुंड येथे करण्यात आले आहे. State Level Elocution Competition
या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या स्पर्धकास आचार्य अत्रे फिरता करंडक प्रदान करण्यात येणार असून प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ सहा अशी रोख रक्कमेची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत १२५ स्पर्धक सहभागाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्पर्धेसाठी आचार्य अत्रे यांचे बेळगाव कारवार सीमा लढ्यातील योगदान, मला समजलेले आचार्य अत्रे, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक भान, आचार्य अत्रे आणि विडंबन साहित्य हे चार विषय ठेवण्यात आले असून स्पर्धेचा कालावधी ७ मिनिटे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशिका ३० जुलै २०२४ पर्यंत पाठवाव्यात. State Level Elocution Competition
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आचार्य अत्रे जयंती दिनी मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मराठा मंडळ मुलुंड मुंबई या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी अरुण भंडारे – ९८२००५५७७४, श्रीकांत फौजदार -९८३३०२७२७७, महाराष्ट्र सेवा संघ कार्यालय मुलुंड पश्चिम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. State Level Elocution Competition