• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उदय रावणग यांना राज्यस्तरीय अपंग सेवा पुरस्कार

by Manoj Bavdhankar
October 10, 2022
in Guhagar
20 0
0
State level award to Ravanag
39
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.10  : हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड ओगलेवाडी यांच्या वतीने राज्यस्तरीय ८ वा कोकण गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आला. हा गौरव कार्यक्रम लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह चिपळूण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. उदय वसंत रावणग यांना “अपंग सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. State level award to Ravanag

उदय रावणग हे स्वत: दिव्यांग असून ते इतर सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी सतत कार्यरत आहेत. त्यांनी तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी अनेक उपयुक्त उपक्रम राबविले आहेत व राबवीत आहेत. दिव्यागांना दिव्यांगत्वाचे सिव्हील सर्जन रत्नागिरीचे प्रमाणपत्र काढून देणे, अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देणे, संजय गांधी पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणे, विविध कोर्सेसेच्या कार्यशाळा घेणे, दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांगांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य मिळवून देणे, विविध क्रीडा स्पर्धा घेणे इत्यादी अनेक बाबींसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. श्री. उदय वसंत रावणग यांना यापूर्वी ही विविध क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे वतीनेही त्यांचे सर्व दिव्यांग सभासद यांनी अभिनंदन केले आहे. State level award to Ravanag

या कार्यक्रमासाठी डॉ. विजय बाळासाहेब माटे, चिपळूण, रत्नागिरीचे सरकारी वकील श्री. विध्याधर जोग, एक्सल कंपनी लोटेचे सिनिअर व्यवस्थापक श्री. सुरेश पाठणकर, डॉ. चंद्रकांत भागवत, डॉ. हाफिज, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील फडतरे, कार्याध्यक्ष श्री. संजय अहीर आदि मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. State level award to Ravanag

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarState level award to RavanagUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.