लेखिका प्रा. मनाली बावधनकर, महिलांच्या संघर्षावरील कथा
गुहागर, ता. 08 : तालुक्यातील प्रा. मनाली बावधनकर याच्या बाईपणाच्या उंबरठ्यावर पुस्तकाला साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन, फलटण, माणगंगा साहित्य परिषद, पांगरी, ता. माण, मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), ज्ञानदीप शिक्षण संस्था, जि. सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर साहित्यसेवा प्रज्ञा मंच सातारा यांचे तर्फ बाईपणाच्या उंबरठ्यावर या कथा संग्रहाला पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार वितरण मे महिन्यात करण्यात येणार आहेत. State level award for book on the threshold of womanhood

या पुस्तकाला दोन पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे साहित्य प्रेमी व गुहागर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पूर्वी त्यांचे ओघळलेले मोती या पुस्तकाला चिपळूण लोटीस्मा यांचा कवि आनंद पुरस्कार मिळाला होता. State level award for book on the threshold of womanhood
‘बाईपणाच्या उंबरठ्यावर’ या पुस्तकातून त्यांनी स्त्रीच्या विविध रुपांची, त्यांच्या समोरील आव्हानांची उकल केली आहे. सरोगसी, स्त्री- स्वातंत्र्य, करियरबद्दल महत्वाकांक्षा, महाविद्यालयीन जीवन अशा विविध विषयांवर आधारित कथा या पुस्तकात आहेत. सध्याच्या आणि मागच्या काळातील स्त्रियांच्या स्थितीमध्ये विशेष बदल झाला नसून स्त्रियांच्या समस्या आजही कायम आहेत. ओघळलेल्या मोती नंतरचा बाईपणाच्या उंबरठ्यावर हा कथा संग्रह म्हणजे घडवलेले मोती आहे. यातील कथा पिढ्यानपिढ्या वेदनांचे ओझे वहाणाऱ्या, वादळाशी संसार करणाऱ्या, वेगळ्या वाट्या चालणाऱ्या स्त्रीयांच्या आहेत. State level award for book on the threshold of womanhood
