• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरचा आमदार होण्यासाठी आतापासूनच कामाला लागा

by Ganesh Dhanawade
April 13, 2024
in Guhagar
200 2
2
Start working to become an MLA
392
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार शेखर निकम यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन

गुहागर, ता. 13 : रायगड लोकसभा मतदारसंघातील एकूण ६ मतदारसंघापैकी ५ मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. पेणमधून ६० हजाराचे मताधिक्य देण्याचा निर्धार धैर्यशील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. फक्त गुहागर मतदारसंघात आपला आमदार नसल्याने कार्यकर्त्यांना येथे लढावे, झगडावे लागणार आहे. पुढील चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका असून गुहागरमध्ये भाजप आमदार होण्यासाठी आतापासून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी केले. Start working to become an MLA

Start working to become an MLA

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या बूथप्रमुख, गटप्रमुख, वाँरीयर्स या प्रमुख कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा शृंगारतळी येथील भवानी सभागृहात पार पडला. यावेळी शेखर निकम यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार मधुकर चव्हाण, धैर्यशील पाटील, डाँ. विनय नातू, सूर्यकांत दळवी, जिल्हाध्यक्ष केदार साठे, सौ. सुरेखा खेराडे, चित्रा चव्हाण, निलम गोंधळी, प्रशांत शिरगावकर, लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Start working to become an MLA

यावेळी आ. निकम म्हणाले, भाजप हा शिस्तीचा व सुसंस्कृत पक्ष आहे. गाव पातळीवर भाजपचा एक- एक कार्यकर्ता महत्वाचा असतो. त्यामुळे तितकीच त्यांची प्रचार यंत्रणाही सक्षम असते. अशापद्धतीने काम करण्याची शिस्त असल्याने भाजपला आज देशभरात यश मिळत आहे. विकासाच्या बाबतीत मी नशिबवान आहे. महायुतीच्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघात गेल्या ६ महिन्यात सातशे कोटीची कामे करु शकलो. सावर्डेसारख्या ठिकाणी पाझर तलाव मंजूर करुन घेतला असून भविष्यात आम्हाला येथे धरण नको तर पाझर तलाव पाहिजेत अशी मागणी केली पाहिजे. महायुतीचा धर्म पाळणे आमचे काम आहे. त्यामुळे मी गुहागर मतदारसंघाकडे माझे लक्ष असल्याचे निकम यांनी सांगितले. तसेच देशाची घटना बदलण्याचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. घटना बदलायचीच असती तर गेल्या १० वर्षात केव्हाच बदलता आली असती. त्यामुळे अशा अफवांवर कुणीही विश्वासू ठेऊ नये, असे शेवटी निकम यांनी आवाहन केले. Start working to become an MLA

Start working to become an MLA

माजी आ. मधुकर चव्हाण यांनी अनंत गीते यांच्यावर टीका केली. गीते यांना मते मागण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे कुणाच्या मांडी लावून बसले आहेत ते पहावे. नको त्यांना हाताशी धरले आहे. त्यांच्या या राजकारणाला कंटाळून ४० आमदार बाहेर पडले आणि त्यांनाच तुम्ही खोकेदारी म्हणून आरोप करत आहात. ही वेळ तुमच्यावर का आली याचे परिक्षण करावे. संपूर्ण जगात पंतप्रधान मोदींचे कौतुक होत आहे. त्यामुळे त्यांना मारण्याचा कट केला जात असल्याचे खळबळजनक वक्तव्य मधु चव्हाण यांनी केले व हे मी जबाबदारीने बोलत असल्याचे स्पष्ट केले. Start working to become an MLA

माजी आमदार डाँ. विनय नातू यांनी गीतेंच्या कार्यप्रणालीविषयी बोलताना गीतेंची प्रचारयंत्रणा मी अनुभवली आहे. भाषणामधून ते हात वर करुन लोकांना त्यांना मतदान करण्याच्या शपथा घ्यायला सांगतात. मात्र, हे पराभव झाल्यानंतर गेल्या पाच वर्षात ते कितीवेळा गुहागरकडे फिरकले हे त्यांनी सांगावे, असा आरोप केला. धैर्यशील पाटील यांनी, पक्षाचा आदेश हा महत्वाचा मानून आम्ही महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासून कामाला लागल्याचे सांगून आमच्या भागातून सर्वाधिक मताधिक्य सुनील तटकरे यांना देणार असल्याचे स्पष्ट केले. Start working to become an MLA

Tags: AdvaniAnant GeeteBhaskar JadhavGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsMLA Bhaskar JadhavNarayan RaneNews in GuhagarNilesh RanePrime Minister ModiRajan SalviShiv SenaShiv Sena leader Anil ParabStart working to become an MLAUddhav ThackerayUpdates of GuhagarVajpayeeअडवाणीअनंत गीतेआमदार भास्कर जाधवउद्धव ठाकरेगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याप्रधानमंत्री मोदीमराठी बातम्याराजन साळवीलोकल न्युजवाजपेयीशिवसेनाशिवसेना नेते अनिल परब
Share157SendTweet98
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.