लाल परीची चाके थांबली; प्रवाशांचे हाल?
मुंबई, ता. 03 : एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आज पासून राज्यव्यापी संप आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तरावरील 13 संघटनेची कृती समितीनं संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघाला नसल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आजपासून (3 सप्टेंबरपासून) एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. ST Employees Strike
त्याचबरोबर ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक दिल्याने महामंडळाकडून नियोजन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी जादा बसेस पाठविण्यात येणार असल्याने धरणे आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्यासाठी आवाहन करण्याच्या सूचना देखील महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. बसस्थानकावर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा, यासंदर्भात सूचना देखील करण्यात आल्या आहेत. आंदोलनावेळी बसस्थानकात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. आंदोलनामुळे फेऱ्या रद्द झाल्यास त्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयाला देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. ST Employees Strike
11 कामगार संघटनाच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे आज 3 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 251 आगारापैकी 35 आगार पुर्णतः बंद आहेत. बाकीचे आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरू आहेत. मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. त्याचबरोबर, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पुर्णतः बंद आहेत. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. तेथे बंदचा इतका प्रभाव दिसून येत नाही. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत. ही माहिती अधिकृत माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर संघटनेने हा संप पुकारल्यानं याचा फटका प्रवाशांना बसत आहे. भंडारा विभागातील सहा आगारात हा बंद राहणार असून यात पाच कर्मचारी संघटना सहभागी झाले आहेत. ST Employees Strike