प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांची मागणी
गुहागर, ता. 12 : राज्यातील सर्वच एसटी महामंडळाचे आगारात चालक व वाहक तसेच आवश्यक बस ची यांची कमतरता आहे. यामुळे आगारातील अधिकारी यांना प्रवाशांना योग्य तो न्याय देता येत नाही. आगाराची वेळापत्रक कोलमंडली आहेत. रिबुक वर रिबूक मारून चालक व वाहक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अशा वेळी जर का मोठा अपघात घडला तर प्रवाशी जनतेची जबाबदारी कोण घेणार? सरकारला याचे काही पडलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत गंभीर विचार करून राज्यातील एसटी महामंडळाचे आगारांना आवश्यक नोकर भरती व बसेस द्याव्यात, अशी मागणी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी सरकारकडे केली आहे. ST depot schedule collapsed
राज्यात प्रत्येक तालुक्यात डेपो आहेत. काही डेपोत चालक वाहक व गाड्यांच नाहीत. यामुळे दैनंदिन वेळा पत्रक कोलमंडले आहे. शालेय विद्यार्थी व व्यापारी सामान्य नागरिकांना मोठया समस्या ना सामोरे जावे लागत आहे. याला सरकार जबाबदार आहे, असे कांबळे यांनी म्हटलं आहे. ST depot schedule collapsed
