• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर–चिपळूण मार्गावर एसटी बसला ट्रकची धडक

by Mayuresh Patnakar
September 22, 2026
in Guhagar
223 2
4
ST bus hit by a truck
438
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील पिंपर येथून नालासोपारा येथे चाकरमान्यांना  घेऊन जाणाऱ्या बसला गुहागर–चिपळूण मार्गावरील काजळी येथे मागून लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना काल सोमवारी सायंकाळी घडली. या अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ST bus hit by a truck

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपर येथून प्रवाशांना घेऊन नालासोपाराच्या दिशेने ही बस जात होती. काजळी परिसरात बस मार्गावरून पुढे जात असताना मागून आलेल्या लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकची बसला धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की, या घटनेनंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने हा अपघात झाला असावा, अशी चर्चा होती. मात्र अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. अपघातामुळे गुहागर–चिपळूण मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांना काही काळ तत्काळत बसावे लागले. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. ST bus hit by a truck

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarST bus hit by a truckटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share175SendTweet110
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.