• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर शहरात एसटी व चारचाकी अपघात

by Mayuresh Patnakar
June 21, 2023
in Guhagar
1.2k 13
1
ST and four wheeler accident in Guhagar city
2.4k
SHARES
6.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सुदैवाने सर्व सुखरुप, पोलीस ठाण्यात नोंद नाही

गुहागर, ता. 21 : शहरातील वरचापाट येथील तीव्र वळणावर चारचाकी वाहन एस.टी.वर येवून आदळले. या अपघातात चारचाकीचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सदर अपघातानंतर चारचाकीच्या मालकाने एस.टी.ला नुकसाभरपाई देवून प्रकरणावर पडदा टाकला. त्यामुळे पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झालेली नाही. ST and four wheeler accident in Guhagar city

ST and four wheeler accident in Guhagar city

बुधवारी (ता. 21) दुपारी अनिल कृष्णा कदम आपल्या मालकीची चारचाकी (एम.एच.06 टी 6033 घेवून गुहागरकडून रानवीकडे जात होते. तर पिंपळवट गुहागर ही एस.टी. (क्र. एमएच 14 बी.टी.1586 ) आरेगावातून गुहागरच्या दिशेने येत होती. दोन्ही वहाने वरचापाट येथील तीव्र वळणात असताना चुकीच्या बाजुने आलेल्या अनिल कदम यांच्या वाहनाने एस.टी.ला धडक दिली. चुकीच्या दिशेने येणारी चारचाकी आपल्या एस.टी.वर आदळणार हे एस.टी. चालक देवरूखकर यांनी एस.टी. बाजुला घेवून थांबवली त्यामुळे धडकेची भिषणता खूप कमी झाली. यावेळी एस.टी.मध्ये प्रवासी व विद्यार्थी होते. सदर अपघातात दोन्ही वाहनांमधील कोणीही जखमी झाले नाही. ST and four wheeler accident in Guhagar city

ST and four wheeler accident in Guhagar city

अपघाताचे वृत्त कळताच एस.टी.चे अधिकारी घटनास्थळी पोचले. अंतर्गत पहाणी, पंचनामा, कार्यालयीन अहवाल आदी बनविण्यासाठी आवश्यक ती माहिती एस.टी.चे अधिकारी घेत होते. त्यावेळी चारचाकीचे मालक अनिल कदम यांनी पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ नये. एस.टी.चे नुकसान भरुन देण्यास तयार आहे. असे अधिकाऱ्यांना सांगितले. सदर धडकेत एस.टी.चे किरकोळ नुकसान झालेले असल्याने या तडजोडीला एस.टी.चे अधिकारी तयार झाले. त्यामुळे सदर अपघाताची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात कोणीही केलेली नाही. ST and four wheeler accident in Guhagar city

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarST and four wheeler accident in Guhagar cityUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share948SendTweet593
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.