पुणे, ता. 08 : मार्च महिन्यात दहावीची परीक्षा संपली. परीक्षा संपल्याने विद्यार्थी टेन्शन फ्री झाले आहेत. पण, आता विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. मागील वर्षी दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लावण्यात आला होता. या वर्षीही निकाल १५ मे’च्या आधीच निकाल लावण्याची तयारी बोर्डाची आहे. SSC result soon
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एसएससी म्हणजे दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. मार्च महिन्यात ही परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. यावर्षी १५ मे पूर्वीच निकाल लावण्याची तयारी बोर्डाने केल्याचे सांगण्यात येत आहे. पुढे लगेचच अँडमिशनची प्रक्रिया सुरू होते, त्यामुळे लगेच निकाल लावण्याची तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, जुलैच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा होणार आहेत. यामुळे निकाल मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत निकाल लावण्यात येणार आहे. पण, निकालाची तारीख अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. SSC result soon


दहावीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात एकही प्रकार गेल्या पाच परीक्षेत आढळलेला नाही. यावर्षीही तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात दहावी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकच आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळापैकी रत्नागिरीच्या या मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती सर्वांच्या सहकार्याने रुजवली आहे. बारावी परीक्षेत रत्नागिरीत एक कॉपी प्रकाराची नोंद झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सन २०१२ पासून कार्यरत आहे. सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यात आल्यामुळेच त्याचा सकारात्मक परिणाम झाला. SSC result soon