• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक

by Guhagar News
November 3, 2022
in Bharat
23 0
0
SSC & HSC Attendance Compulsory
46
SHARES
130
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केले स्पष्ट

गुहागर, ता. 03 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही. विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य (Attendance Compulsory) असणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन किमान ७५ टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) स्पष्ट केले आहे. SSC & HSC Attendance Compulsory

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा १ जानेवारीपासून आढावा घेऊन कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची यादी विभागीय कार्यालयांना पाठवली जाईल. कमी उपस्थिती असण्यामागे आजारपण, जवळच्या व्यक्तीचे निधन, स्पर्धेतील सहभाग असे काही प्रामाणिक कारण असल्यास ते सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरावे ७ जानेवारीपर्यंत विभागीय कार्यालयाकडे सादर करावे लागतील. या मुदतीनंतर कोणाही विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार नाही, असे सीबीएसईने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. SSC & HSC Attendance Compulsory

मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे शाळा चुकावणाऱ्या विद्यार्थांना आता या आदेशाचा चांगलाचं फटका बसणार आहे. SSC & HSC Attendance Compulsory

सीबीएसईकडून या संदर्भातील परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. सीबीएसईने देशभरातील शाळांना १८ जुलैला परिपत्रक पाठवून विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के  उपस्थिती असण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. आता सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने सीबीएसईकडून पुन्हा एकदा या संदर्भातील कार्यवाही करण्याची सूचना शाळांना देण्यात आली आहे. संबंधित शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थिती संदर्भात शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सदर बाब निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देश दिले आहेत. SSC & HSC Attendance Compulsory

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSSC & HSC Attendance CompulsorySSC HSCUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet12
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.