विकास मालप: उज्वल यशाची परंपरा सुरु ठेवा
गुहागर, ता. 06 : आपल्या तांबडवाडीमध्ये प्रथमच दहावीच्या परिक्षेत उज्वल यश सृष्टी माटल हिने संपादन केले आहे. हा पायंडा येथील सर्व विद्यार्थ्यांनी असाच पुढे न्यायचा आहे. आणि भरभरून यश संपादन करायचे आहे. असे वक्तव्य माजी नगरसेवक विकास मालप यांनी आयोजित सत्कार कार्यक्रमात केले. Srishti is felicitated by Guhagar Tambatwadi

गुहागर खालचापाट जांगळवाडी (तांबडवाडी कोंड) येथील सृष्टी दीपक माटल हीने दहावीच्या परीक्षेत 93. 40 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिच्या या उज्वल यशाबाबत शुभेच्छा देण्यासाठी तांबडवाडी येथे ग्रामस्थांतर्फे तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार या वाडीचे माजी उपाध्यक्ष किसन घरट, माजी अध्यक्ष बाळाराम मालप, माजी सदस्य विकास मालक यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला वाडीतील सर्व ग्रामस्थ उभे होते उपस्थित होते. Srishti is felicitated by Guhagar Tambatwadi

या कार्यक्रमात सृष्टी मालप म्हणाली की, या यशात माझे शिक्षक, आई, वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यापुढील शिक्षण ती विज्ञान शाखेतून करणार असल्याचे सांगितले. Srishti is felicitated by Guhagar Tambatwadi

तांबड वाडीमध्ये असे पहिल्यांदाच सृष्टी माटल हिला 93. 40 टक्के मार्क मिळाले. तिचे मी अभिनंदन करतो. व तिला पुढील शिक्षणासाठी खूप शुभेच्छा. तसेच यापुढे वाडीतील सर्व विद्यार्थ्यांनी तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून असेच यश सर्वांनी संपादन करावे, असे वक्तव्य मालप यांनी केले. Srishti is felicitated by Guhagar Tambatwadi
