लाखो कारसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली – अनिरुद्ध भावे
गुहागर, ता. 23 : राम जन्मभूमी साठी देशभरातील लाखो कारसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यामध्ये गुहागर तालुक्यातील सुमारे 37 कार सेवक यासाठी झटले. त्यामुळे प्रभूंच्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा व मंदिर निर्माणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे. असे प्रतिपादन कार सेवक अनिरुद्ध भावे यांनी केले. आरे येथील श्रीराम मंदिरात प्रभू अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण आणि श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. Sri Ram’s inauguration ceremony at Aare
यावेळी व्यासपीठावर गजानन दीक्षित, श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष महेश भोसले, सरपंच समित घाणेकर, संदीप जनार्दन भोसले, सुहासिनी जनार्दन भोसले, उपाध्यक्ष संदीप आत्माराम भोसले होत. शाळ श्रीफळ आणि सन्मान पदक देऊन सत्कार करण्यात आला. प्रभू श्रीरामांच्या विधीवत शोडषोपचारे पुजनाने सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर गावातील हनुमान मंदिरात पुजा करुन श्रीरामांची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी १०.०० वाजता श्रीराम यज्ञाला आरंभ झाला. श्रीराम जय राम जय जय राम नमः या राम नाम जपाच्या ५३ हजार तिळाच्या आहुती करण्यात आल्या. या सामुदायिक यज्ञ विधीत सुमारे ४९० ग्रामस्थांनी उत्साहात सहभाग घेतला. यानंतर कारसेवकांचा सत्कार व मनोगत झाले. रामनाम जप, श्रीराम नाम गजरात पुष्पवृष्टी, महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी दिव्यांची रोषणाई, गीत रामायणाने कार्यक्रमाची सांगता झाली. Sri Ram’s inauguration ceremony at Aare
यावेळी श्रीदत्त प्रसादिक मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोद भोसले, श्रीदत्त प्रासादिक देवकर मंडळाचे अध्यक्ष संदीप देवकर, स्वप्निल भोसले, नंदकुमार भोसले, संदेश देवकर, श्रीकर भोसले, श्रीकांत महाजन, शशिकांत महाजन आदी उपस्थित होते. Sri Ram’s inauguration ceremony at Aare