• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

झिका व्हायरसचा वेगाने प्रसार

by Guhagar News
July 2, 2024
in Health
119 2
0
Spread of Zika virus in Pune
235
SHARES
670
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुण्यात गर्भवती महिलेसह आतापर्यंत ६ जणांना संसर्ग

गुहागर, ता. 02 : पुण्यात झिका विषाणूचा वेगाने प्रसार होत असून आतापर्यंत शहरात झिका विषाणूने बाधित ६ जण आढळले आहेत. यात दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित महिला ही पहिल्या झिका विषाणूबाधित महिलेच्या घरापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर गणेश नगर, एरंडवणे येथील रहिवासी आहे. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ती १२ आठवड्यांची गर्भवती आहे. बाधित दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर आहे. Spread of Zika virus in Pune

महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गंभीर बाब आहे. बाधित महिलेमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. तिची अॅनोमली स्कॅन बाकी आहे. तिच्या आरोग्यावर आणि गर्भाच्या वाढीवर लक्ष घेऊन आहोत. तसेच सहा महिन्यांची गरोदर असलेल्या २८ वर्षीय महिलेची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे डॉ. दिघे यांनी सांगितले. दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय गर्भवती महिलेचे नमुने २७ जून रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले होते. एनआयव्हीने सादर केलेल्या अहवालात या महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान केले. Spread of Zika virus in Pune

डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या संसर्गाचा प्रसार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संक्रमित एडीज डासांमुळे झिका विषाणूचा प्रसार होतो. झिकाची लागण झालेले बहुतेक लोक एकतर लक्षणे नसलेले असतात किंवा ताप, पुरळ, अंगदुखी आणि सांधेदुखीची अशी सौम्य लक्षणे या रुग्णांमध्ये आढळतात. गर्भवती महिलांमध्ये झिका विषाणूमुळे नवजात मुलांवर परिमाण होऊ शकतो. नवजात बालकांमध्ये डोळ्यांची समस्या, श्रवणशक्ती कमी होणे या सारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या सर्व नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सहा रुग्णांमध्ये झिका विषाणू आढळला आहे, अशी माहिती डॉ. दिघे यांनी दिली. Spread of Zika virus in Pune

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSpread of Zika virus in PuneUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.