गुहागर, ता. 07 : तालुक्यातील कुडली बंदर वाडी क्र.४ या अंगणवाडीसाठी मुंबईतील ए.एच.बी. विद्यार्थी विकास ट्रस्ट मार्फत झोपाळा, राउंड सर्कल, सिसॉ, घसरगुंडी इत्यादी खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. Sports material for Anganwadi

सदर खेळाचे साहित्य ट्रस्टमार्फत मिळवून ते अंगणवाडीला प्रदान करण्यासाठी कुडली गावचे सुपुत्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बुद्धीराम गोपाळ रहाटे यांनी प्रयत्न केले. याबद्दल अंगणवाडी माता पालक समिती अध्यक्ष जान्हवी योगेश डिंगणकर, अंगणवाडी सेविका स्नेहा सुनील दळवी, मदतनीस अंकिता अनंत महाडिक तसेच अंगणवाडीतील मुलांचे पालक यांनी ए.एच.बी. विद्यार्थी विकास ट्रस्ट व बुद्धीराम रहाटे यांचे आभार मानले. Sports material for Anganwadi
