गुहागर, ता. 06 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनियर काॅलेज गुहागर मध्ये दि. 5 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत वार्षिक क्रीडा महोत्सव व खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उदघाटन गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक व क्रीडा समिती अध्यक्ष श्री. राजेश गोयथळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. Sports Festival at Guhagar High School
यावेळी राज्य खेळाडू अर्चीता सुर्वे, तन्मय ओक, वेदश्री धनावडे, गोडबोले पुरस्कार विजेती कनिष्का बावधनकर, विज्ञान रंजन परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेली आर्या मंदार गोयथळे, माध्यमिक शिष्यवृत्ती मिळवणारी प्रेरणा मेटकरी यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या क्रीडा स्पर्धेच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षपत देण्याचा मान अर्चीता सुर्वे हीला देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गोयथळे यांनी तर आभार कृपाल परचूरे यांनी यांनी मानले. Sports Festival at Guhagar High School
यावेळी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संदिप भोसले, शालेय समिती अध्यक्ष दिपक कनगुटकर, संचालक पराग भोसले, कॅनरा बॅंक गुहागर शाखा व्यवस्थापक जाधव, पत्रकार मंदार गोयथळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संकेत गोयथळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिपक देवकर, सहसचिव गौरी घाडे, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, पर्यवेक्षक विलास कोरके, सोनाली हळदणकर, दिलीप मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. Sports Festival at Guhagar High School