संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील पडवे उर्दू या केंद्रांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद शाळा काताळे नं.१ च्या प्रांगणात केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर यांच्या नियोजनाखाली व मुख्याध्यापक रमेश पालशेतकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या. या स्पर्धेचा उदघाटन समारंभ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्पिता बारस्कर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. Sports competitions of Padawe Urdu Center
दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम पडवे उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तवसाळ काताळे गावच्या सरपंच प्रियांका सुर्वे उपस्थित होत्या. यावेळी केंद्राच्या वतीने सरपंच प्रियांका सुर्वे यांचा दिल्ली अभ्यासदौऱ्यात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या क्रीडा स्पर्धेमध्ये शाळा कुडली नंबर १ ने लहान गटाची चॅम्पियनशिप पटकावली. तर मोठ्या गटाची चॅम्पियनशिप काताळे नंबर १ शाळेने पटकावली. स्पर्धेसाठीची सर्व बक्षीसे व चॅम्पियन ट्रॉफी काताळे ग्रामस्थ तसेच गावातील सर्व महिला बचत गटाच्या वतीने देण्यात आलेल्या होत्या. Sports competitions of Padawe Urdu Center
यावेळी केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर यांनी सांघिक व वैयक्तिक गटात विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले व बीटस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य केल्याबद्दल काताळे ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. तसेच स्पर्धेचे नियोजन उत्कृष्ट केल्याबद्दल क्रीडा समिती अध्यक्ष रमेश पालशेतकर, सचिव सुहास गायकवाड, कोषाध्यक्ष दिलीप गुरसळे, संजय राठोड, सुधाकर निमकर व सर्व मुख्याध्यापकांना, शिक्षकांना तसेच मानधन तत्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवकांना धन्यवाद दिले. Sports competitions of Padawe Urdu Center
यावेळी पडवे शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर अजगोलकर, शाळा कुडली माटलवाडीचे अध्यक्ष राजेश वनये, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सुर्वे, माजी सरपंच संतोष बारस्कर, ग्रामपंचायत सदस्य विनायक बारस्कर, ज्येष्ठ नागरिक मोहन गडदे पोलीस पाटील सचिन रसाळ, गिरीश कदम मुख्याध्यापक रमेश पालशेतकर, केंद्रमुख्याध्यापक दाऊद जांभारकर, ग्रामस्थ कृष्णा वाघे शंकर येद्रे, चंद्रकांत निवाते, उपस्थित होते. Sports competitions of Padawe Urdu Center