गुहागर, ता. 17 : आजकाल लहान मुलांचे वाढदिवसानिमित्त हॉल बुकिंग करुन तिथे लहान मुलांच्या कर्मणुकीसाठी जादूचे प्रयोग, लहान मुलांसाठी निरनिराळे कार्यक्रम थोरामोठ्यांना जेवणाची कार्यक्रम अशा थाटामाटात वाढदिवस साजरे केले जातात .परंतु गुहागर खालचापाट येथील निखिल विखारे यांनी मुलाचा (नक्ष) दुसरा वाढदिवस पर्यावरण पूर्वक व कोकणच्या मेवाची जपणूक करत साजरा केला. नक्ष च्या वाढदिवसानिमित्त गुहागर असगोली रस्त्यालगत दोन जांभळाची झाड लावून त्यांची वाढ होईपर्यंत संगोपन करण्याचा निर्णय निखिल विखारे व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. तसेच नक्ष याच्या वाढदिवसाचा केकही झाडाच्या प्रतिकृतीत बनवला होता. Spectacular work by Nikhil Vikhare


कोकणचा मेवा असलेल्या जांभळांच्या झाडांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. तसेच या रस्त्यालगत सावलीसाठी मोठे वृक्ष नसल्यामुळे यांनी तिथेही झाडे लावायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कोकणात सर्व ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फी आंबा, काजू, जांभळे, फणस यासारखी झाड असायची. परंतु आता अशी झाड मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत. तर झाडांची सावली सुद्धा रस्त्यालगत शोधत जावे लागते. अशाच गुहागर असगोली रस्त्यालगत सावलीसाठी एकही रुक्ष नाही. रस्त्यावर अनेक जण सकाळी व संध्याकाळी चालायला, व्यायामला व निवांत गप्पा मारायला येतात. या ठिकाणी दोन जांभळाची झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय निखिल विखारे यांनी घेतला आहे. Spectacular work by Nikhil Vikhare


प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा असे निखिल विखारे यांनी सांगितले. या वृक्षारोपण समारंभाला विखारे कुटुंबीय चिपळूण अर्बन बँकेचे संचालक धनंजय खातू, सागर मोरे, श्री वराती प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष श्री विवेक मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. Spectacular work by Nikhil Vikhare