• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 July 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवसाठी कोंकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार

by Mayuresh Patnakar
July 27, 2026
in Ratnagiri
17 0
0
Special trains on the route for Ganeshotsav
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना एक खुशखबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी इतर मार्गावरच्या गाड्या कमी करून गणेश भक्तांसाठी गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पनवेल टर्मिनस, दिवा जंक्शन, पुणे टर्मिनस, नागपूर टर्मिनस येथून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली सावंतवाडी पर्यंत विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. Special trains on the route for Ganeshotsav

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड – गाडी क्र. 01103 ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड दरम्यान ११ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज धावणार आहे. गाडी क्र. 01104 ही ट्रेन सावंतवाडी रोड ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान, १२ ते २७ सप्टेंबरदरम्यान दररोज धावणार आहे. या दोन्ही ट्रेनच्या प्रत्येकी १६ फेऱ्या होतील. गाडी क्र. 01151 ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड दरम्यान ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज धावणार आहे. गाडी क्रमांक 01152 ही सावंतवाडी रोड ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान, ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान दररोज धावणार आहे. या दोन्ही ट्रेनच्या प्रत्येकी १७ फेऱ्या होतील. लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड – गाडी क्र. 01171 ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड दरम्यान ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज धावणार आहे. – गाडी क्र. 01172 ही ट्रेन सावंतवाडी रोड ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान, ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान दररोज धावणार आहे. गाडी क्र. 01129 लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड दरम्यान १५ आणि २२ सप्टेंबरदरम्यान, दर मंगळवारी धावणार आहे. भक्ती – गाडी क्र. 01130 ही ट्रेन सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान १५ आणि २२ सप्टेंबरदरम्यान, दर मंगळवारी धावणार आहे.- गाडी क्र. 01131 ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड दरम्यान आठवड्यातून दोनदा दर गुरुवार आणि रविवारी १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. गाडी क्र. – 01132 ही ट्रेन सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान आठवड्यातून दोनदा दर गुरुवार आणि रविवारी १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रत्नागिरी – गाडी क्र. 01153 ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रत्नागिरी दरम्यान ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज धावणार आहे. गाडी क्र. 01154 रत्नागिरी ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज धावणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी – गाडी क्र. 01167 ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी दरम्यान आठवड्यातून पाच दिवस ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. – गाडी क्र. 01168 ही ट्रेन रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान, आठवड्यातून पाच दिवस ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. Special trains on the route for Ganeshotsav

दिवा-खेड, दिवा चिपळूण – गाडी क्र. 01155 ही ट्रेन दिवा ते खेड दरम्यान, ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान, २२ सप्टेंबर वगळता दररोज धावणार आहे. गाडी क्र. – 01156 ही ट्रेन खेड ते दिवा दरम्यान, ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान, २२ सप्टेंबर वगळता दररोज धावणार आहे. गाडी क्र. 01133 ही ट्रेन दिवा ते चिपळूणदरम्यान ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान २३ आणि २४ सप्टेंबर वगळता दररोज धावणार आहे. – गाडी क्र.  01134 ही ट्रेन चिपळून ते दिवादरम्यान, ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान २३ आणि २४ सप्टेंबर वगळता दररोज धावणार आहे. या शिवाय रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव, पुणे ते रत्नागिरी या मार्गावरही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. Special trains on the route for Ganeshotsav

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSpecial trains on the route for Ganeshotsavटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.