गुहागर, ता. 21 : गुहागर आगारातून दिवाळी सणानिमित्त प्रवाश्यांच्या सेवेसाठी विविध नवीन एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.अशी माहिती आगार प्रमुख वैभव कांबळे यांनी दिली आहे. यामध्ये तुळजापूर, आंबेजोगाई, पुणे, चिंचवड, विरार, धोपावे, तळी, रत्नागिरी या मार्गावर एसटीच्या नवीन फेऱ्या सुरू होणार आहेत. Special Trains for Diwali from Guhagar Agar

दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची संख्या यांचा विचार करता नवीन एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता, धोपावे, तळी, आबलोली जाकादेवी रत्नागिरी तर सायंकाळी 4 वाजता रत्नागिरी जाकादेवी आबलोली तळी गुहागर. दुपारी 2. 30 वा. रत्नागिरी पावस, दुपारी 3.15 वा. पावस रत्नागिरी. दि. 20 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 5 वा. गुहागर- तुळजापूर, संध्याकाळी 6.30 वा. तुळजापूर- गुहागर तसेच सकाळी 6 वाजता गुहागर- विरार व सकाळी 7 वा. गुहागर- पुणे चिंचवड दि. 21 व 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता गुहागर -आंबेजोगाई तर 22 ऑक्टोबर सकाळी 9 वा. आंबेजोगाई- गुहागर अशा विविध नवीन एसटी फेऱ्या गुहागर आगाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आहेत. Special Trains for Diwali from Guhagar Agar
तरी या एसटी सेवेचा प्रवाशांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन गुहागर आगार प्रमुख वैभव कांबळे यांनी केले आहे
