सचिन वहाळकर यांच्या मागणीला यश
रत्नागिरी, ता. 25 : फेब्रुवारीपासून वास्को वरुन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय.आर.सी.टि.सी. कडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात त्यांनी या आस्था ट्रेनचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केले आहे. त्यांनी नुकतीच कोकण रेल्वेमार्गावरुन अयोध्येसाठी ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. Special train from Konkan railway line to Ayodhya
ही ट्रेन कोकणातील कुडाळ; कणकवली; वैभववाडी; रत्नागिरी; संगमेश्वर; चिपळूण; खेड; माणगांव रोहा या स्थानकांवर थांबणार असून १२ फेब्रुवारीला या गाडीची पहिली ट्रिप असणार आहे. या गाडीच बुकिंग हे फक्त आय.आर.सी.टि. सी. च्या माध्यमातून केल जाणार असून देशभरातून 66 स्थानकांवरून अशा ट्रेन सुटणार आहेत. याचं बुकिंग राउंड ट्रिपमध्ये केलं जाणार आहे. लवकरच IRCTC च्या वेबसाईटवर हे बुकिंग उपलब्ध होईल. सदर विशेष ट्रेन कोकण रेल्वेमार्गावरुन सोडल्याबद्दल त्यांनी IRCTC तसेच रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले आहेत. Special train from Konkan railway line to Ayodhya