गुहागर, ता.19 : पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय तालुक्याचे नावलौकिक करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी, समाजसेवक, शिक्षक, सेवानिवृत्त, उद्योजक यांच्या गुणगौरव विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम श्रीछत्रपती शिवाजी महाराज सभागृह पाटपन्हाळे ग्रामपंचायत येथे सरपंच मा संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. Special felicitated by Gra. Patpanhale


यावेळी तालुक्यातील मान्यवर उद्योजक ह भ प श्री मोहनशेठ संसारे, उद्योजक नासिमशेठ मालाणी, यांचा सत्कार करण्यात आला. श्री दत्ताराम भेकरे, श्री शंकर हिरवे, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री रमेश बेंडल यांचा निवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. रियाझ ठाकूर यांच्या हस्ते प्रा डाँ बाळासाहेब लबडे यांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डाँ लबडे यांनी मनोगत व्यक्त करताना पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री संजय पवार यांचे कौतुक केले. ग्रामपंचायतीचे, आयोजकांचे आभार मानून ग्रामपंचायतीने ही परंपरा कायम ठेवावी. असे सांगितले. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. शाबीरभाई साल्हे यांनी पाटपन्हाळेच्या भाईचार्याचे कौतूक केले. Special felicitated by Gra. Patpanhale


सरपंच संजय पवार म्हणाले की, ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच म्हणून केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सरपंचपदी जनतेने निवडून दिले. गेल्या साडेचार वर्षात पारदर्शकपणे काम केले. आपण दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न करेन. Special felicitated by Gra. Patpanhale
या कार्यक्रमाला पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, समाजसेवक, शिक्षक, व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्री. शाम शिर्के यांनी मानले. Special felicitated by Gra. Patpanhale