ट्वेन्टी -20 विश्वचषकाच्या अंतिम लढत आज
मुंबई, ता. 29 : एकीकडे २०१३ नंतर ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धेत जेतेपदाची प्रतीक्षा करणारा भारतीय संघ, तर दुसरीकडे आजवर कधीही विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाची चव न चाखलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ. मात्र, दोन्ही संघांत क्रिकेटविश्वावर वर्चस्व गाजवण्याची क्षमता. त्यातच दोन्ही संघ अपराजित. दोन्ही संघांत तारांकितांची भरणा. आता हे दोन तुल्यबळ संघ आज, शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आमनेसामने येणार असल्याने जेतेपदासाठी कडवी झुंज पाहायला मिळणे अपेक्षित आहे. South Africa’s challenge to India
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग दुसऱ्या वर्षी ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळणार आहे. गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातही भारतीय संघाने अंतिम फेरीचा टप्पा गाठला होता. ती स्पर्धा आणि आताची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा यातील भारतीय संघाच्या कामगिरीत बरेच साम्य आहे. South Africa’s challenge to India
एकदिवसीय विश्वचषकात भारताने आपले सर्व सामने जिंकताना चाहत्यांना जेतेपदाचे स्वप्न दाखवले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा अंतिम अडथळा पार करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला होता. ट्वेन्टी-२० विश्वचषकात पावसामुळे भारताचा कॅनडाविरुद्धचा साखळी सामना रद्द करावा लागला. मात्र, त्या व्यतिरिक्त भारताने आपले सर्व सामने जिंकतच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आता तरी भारतीय संघ आपली दशकभरापासून जेतेपदाची प्रतीक्षा संपवेल अशी चाहत्यांना आशा आहे. South Africa’s challenge to India