नासा व इस्रो भेटीसाठी आवश्यक साहित्य व शैक्षणिक खर्च उचलणार
गुहागर, ता. 03 : केंद्र स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत सातत्य राखून आपले स्थान निश्चित करणारी कु. सोनाली मोहन डिंगणकर हीचा सत्कार चंद्रकला उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आला. या समूहाच्या वतीने नासा व इस्रो भेटीसाठी कु. सोनाली हिला आवश्यक ते साहित्य पुरविण्यात आले. तसेच तिचा आठवी ते बारावी पर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च उचलण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख तथा चंद्रकला उद्योग समूहाचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. सचिन बाईत यांनी दिली. Sonali felicitated by Chandrakala Industry Group
प्राथमिक शाळा काजुर्ली नं.२ ची इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी सोनाली इस्रो भेटीसाठी तालुक्यातून पात्र ठरलेली आहे. तिच्या या दैदिप्यमान, प्रेरणादायी, आदर्शवत व अभिमानास्पद यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. याबद्दल चंद्रकला उद्योग समूहाच्या वतीने कु. सोनाली डिंगणकर हिला ट्रॅव्हल्स बॅग, ब्लेझर, शर्ट, पॅन्ट, शूज, टाय इत्यादी साहित्य देण्यात आले. तसेच आठवी ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलण्यात येणार आहे. Sonali felicitated by Chandrakala Industry Group
यावेळी बोलताना श्री. सचिन बाईत म्हणाले की, जिद्द, चिकाटी, परिश्रम व सातत्य राखून नासा आणि इस्रो या जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थाना भेट देण्याच्या यादीत स्थान निश्चित केल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधक विषयक जिज्ञासूवृत्ती वृद्धिंगत होऊन आपल्या जिल्ह्यामधून भावी शास्त्रज्ञ निर्माण होतील. असा विश्वास व आशावाद व्यक्त केला. तसेच सोनाली व मार्गदर्शक, सहकारी शिक्षकांचे, पालकांचे तसेच ही पारदर्शक यंत्रणा राबविणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले. Sonali felicitated by Chandrakala Industry Group
या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, डॉ. अथर्व बाईत, रजत बाईत, मुख्याध्यापक दशरथ साळवी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सचिन सावंत, सरपंच काजुर्ली श्रीम. रुक्मिणी सुवरे, श्री. गुडेकर, श्रीम. माने आदी उपस्थित होते. Sonali felicitated by Chandrakala Industry Group