गुहागर, ता. 25 : जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो, तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ह्याला आपण सूर्यग्रहण असे म्हणतो. जेव्हा सूर्य काही अंशीच झाकला जातो, तेव्हा त्याला आपण खंडग्रास सूर्यग्रहण (Continental Solar Eclipse) असे म्हणतो. ही खगोलीय घटना अनुभवण्याची संधी गुहागरवासीयांना मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी गुहागरच्या समुद्रावर (बाजारपेठे) मंगळवारी (ता. 25 ऑक्टोबर) सायं. 4.30 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन आयुका (IUCAA) मध्ये कार्यरत असलेल्या संशोधिका सौ. शिवानी पेठे – काणे यांनी केले आहे. Solar eclipse will be seen in Guhagar

ग्रहण पहाणे हे अशुभ असल्याचा एकेकाळी समज होता. मात्र विज्ञानाने चंद्र, सुर्य आणि पृथ्वी एका विशिष्ट स्थितीत आल्यावर ग्रहण लागते. आणि आकाशात घडणारी एक विलक्षण, विलोभनीय स्थिती आहे. हे सिध्द केले. त्यानंतर ग्रहणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी खगोलशास्त्राचा अभ्यास करणारी मंडळी विविध ठिकाणी जावून जनतेला याबाबत माहिती देवू लागली. Solar eclipse will be seen in Guhagar

याच उपक्रमाचा भाग म्हणून प्रा. जयंत नारळीकर यांनी स्थापन केलेल्या अंतर विश्वविद्यालय केंद्र: खगोलविज्ञान आणि खगोलभौतिकी (IUCAA) मधील मुक्तांगण विज्ञान शोधिकेत कार्यरत असलेल्या सौ. शिवानी पेठे – काणे गुहागरला येत आहेत. 25 ऑक्टोबर 2022 रोजी दिसणारे खंडग्रास सूर्यग्रहण दुर्बिणीद्वारे पाहण्याची संधी त्यांच्यामुळे गुहागर तालुकावासीयांना उपलब्ध झाली आहे. Solar eclipse will be seen in Guhagar
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर (बाजारपेठ) सायं. 4.30 वा. खंडग्रास सुर्यग्रहण दाखविण्यासाठी त्या विशिष्ट प्रकारची दुर्बीण आणि कॅमेरा घेवून येणार आहेत. त्याचबरोबर खास आवरण असलेले चष्मे (Solar Goggles) देखील त्या उपलब्ध करुन देणार आहेत. शिवाय या खंडग्रास सुर्यग्रहणाची माहिती देखील त्या देणार आहेत. त्यामुळे गुहागर तालुकावासीयांनी हे सुर्यग्रहण पहाण्यासाठी समुद्रावर उपस्थित रहावे. असे आवाहन सौ. शिवानी पेठे – काणे यांनी केले आहे. Solar eclipse will be seen in Guhagar

सौ. शिवानी पेठे-काणे या गेली 5 वर्षे आयुकाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेत कार्यरत आहेत. त्या गेली अनेक वर्षे वैज्ञानिक खेळण्यांची कार्यशाळा देखील घेतात. तर आयुका (IUCAA) गेली 34 वर्षे खगोशास्त्र या विषयातील साशोधनामध्ये कार्यरत आहे. प्राध्यापक जयंत नारळीकर यांनी स्थापन केलेली ही संस्था, खगोलशात्रामध्ये विविध विज्ञान प्रसार कार्यक्रम नेहमीच आयोजित करत असते. Solar eclipse will be seen in Guhagar
मुक्तांगण विज्ञान शोधिका, चष्मे, Solar Goggles, Continental Solar Eclipse, खंडग्रास सूर्यग्रहण, IUCAA, आयुका
आयुका या संस्थेतर्फे खंडग्रास सुर्यग्रहण Live पहाण्याची संधी देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी सायंकाळी 4.30 नंतर खालील लिंकवर क्लिक करावे.
https://www.youtube.com/IUCAASciPOP