Guhagar news : कोणाही मनुष्याचे विचार ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या असते आणि व्यक्तिमत्व त्याच्या चारित्र्याचा पाया असतो. मनुष्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष देणे आणि विचार शुद्ध ठेवणे महत्त्वाचे असते. प्राचीन भारतातील जीवनपद्धतीचा मूळ उद्देश हाच होता. त्याकाळी विचारांच्या शुद्धीकरणाला खूप महत्त्व दिलेले होते. यामुळे प्राचीन मनुष्य आणि निसर्ग व पर्यावरण यांच्यात सखोल संबंध होता. निसर्ग पूजनीय होता. पिढ्यांनी निसर्गाचे संतुलन राखले होते. Social Pollution’ the root of all problems
दुर्दैवाने आजचा मनुष्य हा स्पर्धा, इर्षा, भौतिक सुख, मोठाल्या इमारती, निर्भयपणे धावणारी वाहने आदी चकचकीत प्रगतीच्या मागे धावू लागला. त्याला एकदाही क्षणभर थांबून ‘या प्रगतीची किंमत काय?’ असा विचार करायला वेळ मिळाला नसावा? हे सारं बारकाईनं अभ्यासलं तर लक्षात येईल, निसर्ग आणि पर्यावरणातील प्रदूषण ही आपली मुख्य समस्या नसून ते सामाजिक प्रदूषणाचे एक लक्षण आहे. आपल्या मनातील वाढती असूया, विचार, निर्जीव गोष्टींबद्दलची ओढ, स्पर्धा, मोबाईलद्वारे माहितीच्या भोवती फिरणारे जग, समाजमाध्यमांनी निर्माण केलेले आपले दुहेरी व्यक्तिमत्व यातून सर्व समस्यांचे मूळ असलेले ‘सामाजिक प्रदूषण’ अधिकाधिक गंभीर बनते आहे. Social Pollution’ the root of all problems
दैनिक केसरीच्या सांगली-कोल्हापूर आवृत्तीच्या ‘वार्षिकोत्सव’ (१६ जुलै) निमित्ताने ‘भारताची वाढती लोकसंख्या-देशाच्या विकासासाठी किती उपयुक्त!’ (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA)च्या ताज्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे) या विषयावरील विशेषांकात काल (दि. २२) प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी कृपया लिंक क्लिक करा. Social Pollution’ the root of all problems