गुहागर, ता. 08 : श्री स्वामी दत्त फाऊंडेशन(रजि.) अंतर्गत प्रत्येक महिन्याला “सामाजिक बांधिलकी उपक्रम” राबविण्यात येतो. हा कार्यक्रम दि. 05 फेब्रुवारी 2023 रोजी अनाथ, वंचित व भटक्या मुला-मुलींचे वसतिगृह असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ह्या महिन्यातील राबविण्यात आला. “Social Activities” by Swami Datt Foundation

ह्यावेळी वसतिगृहातील सर्व मुला-मुलींना नाष्टा आणि जेवण”श्री स्वामी दत्त फाऊंडेशन(रजि.)”-महाराष्ट्र राज्य यांचेकडून देण्यात आले. आपले वैयक्तीक आयुष्य जगत असताना आपण ह्या समाजातील वंचित, अनाथ, भटक्या मुला-मुलींसाठी जेवण जरी देवू शकलो तरी खूप मोठे पुण्य मिळवत असतो. ह्याची जाणीव मनात ठेवून फाऊंडेशन अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम प्रत्येक महिन्याला करत आहे. “Social Activities” by Swami Datt Foundation

अनाथ, वंचित, भटक्या मुला-मुलींसाठी फेब्रुवारी महिन्यातील उपक्रमासाठी देणगीमुल्य श्री. गोविंद दगडूलाल हेडा (नाशिक), श्री. तुषार मनोहर खोपडे (डोंबिवली मुंबई), श्री. अनिल हरिचंद्र गावकर (मालाड मुंबई) श्री. व सौ. राधिका कृष्णकांत घाडिगांवकर (मुंबई) यांनी दिले. या सर्व देणगीदारांचे श्री स्वामी दत्त फाऊंडेशन, श्री स्वामी दत्त अध्यात्मिक उन्नती केंद्र(रजि.), परलोक शक्ती फेसबुक-व्हॉट्सॲप गृप चे संस्थापक अध्यक्ष डॉ.शंकर (अण्णा) लेकरे यांनी आभार मानले. “Social Activities” by Swami Datt Foundation

