गुहागर, ता. 06 : शिवसेनेचे तालुका प्रमूख सचिन बाईत यांच्या पत्नी सौ. स्नेहल या नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत १२६० भरघोस मतांनी संचालक पदी विजयी झाल्याबद्दल आबलोली – खोडदे विविध कार्यकारी सोसायटी तर्फे सत्कार करण्यात आला. Snehal felicitated by Aabaloli-Khodde Society


सौ. स्नेहल बाईत या सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच पुढे असतात. त्यांना सहकाराची चांगली माहिती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्याबद्दल सोसायटीचे सदस्य व शिवसेनेचे तालुका सचिव विलास गुरव, खोडदेचे सरपंच लवेश पवार, उपसरपंच कु. पूजा गुरव यांनी सौ. स्नेहल सचिन बाईत यांचा शाल, श्रिफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Snehal felicitated by Aabaloli-Khodde Society