ग्रा. पं. उमराठ तर्फे आकाश कंदिल प्रशिक्षण व शेतीशाळा संपन्न
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील उमराठ ग्रामपचायतीतर्फे गावातील नवलाई देवीची सहाण येथे शेतीशाळाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या गुहागर कृषी विभागातर्फे क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इंस्टिट्यूट शाखा लोटेतर्फे आकाश कंदिल प्रशिक्षणही देण्यात आले. Sky lanterns from bamboo

श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इंस्टिट्यूटचे (Sri Vivekananda Research and Training Institute) लोटे प्रकल्प एक्सल कंपनीचे समन्वयक विवेक शेंडे, स्वप्निल महाडिक, बसुराज मडीवळ, गौरवी ठसाळे यांनी आकाश कंदिल प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर कृषी अधिकारी श्री. सानप व कृषी सेवक सतिश सपकाळ मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे एमसीएल अंतर्गत श्रम साफल्य आरगेनिक प्रोड्युसर कंपनी लि. या तालुक्यात होवू घातलेल्या जैविक इंधन व सेंद्रिय खत प्रकल्पा संदर्भात एचआर सचिन मोहिते यानी सविस्तर माहिती दिली. त्याच्या समवेत तालुका प्रतिनिधि संतोष घुमे, संदिप गोरिवले, प्रमोद घुमे उपस्थित होते. Sky lanterns from bamboo

सदर कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून केले. व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी कृषी निरिक्षक सानप व कृषी सेवक सतिश सपकाळ मार्गदर्शन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. भात रोग नियंत्रणांतर्गत भातशेतीवर येणारे कडा करपा, करपा, पर्णकोष कडपा या रोगांवर मार्गदर्शन करून त्यावरील उपाय योजना काय करायच्या याबाबत माहिती दिली. तसेच भात कीड नियंत्रणांतर्गत खोडकीड, निळे भुंगेरे, सुरळीतील अळी इत्यादी बाबतीत सुद्धा मार्गदर्शन करून या रोगांवर नियंत्रण कसे करावे या बाबतीत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भातशेतीवर पडणारी कीड, किटक पकडणारा खोड कीड सापळा (Pheromone trap) या पिंजऱ्यांचे मोफत वाटप केले. शिवाय परसबागेत लावण्यासाठी भाजी बियाणे पॅकेट दिले. Sky lanterns from bamboo

त्यानंतर श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इंस्टिट्यूट शाखा लोटेतर्फे स्वप्निल महाडिक, बसुराज मडीवळ आणि गौरवी ठसाळे यांनी उपस्थित ग्रामस्थांना बांबूच्या सहाय्याने आकाश कंदिल कसा बनवायचा याचे प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात महिला बचतगट, शाळा व कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच तरूण ग्रामस्थ मंडळींनी सहभाग घेतला होता. सदर प्रशिक्षणाच्या वेळी राधा आंबेकर, मानसी गावणंग, शांताराम गोरिवले, भिकू मालप, शशिकांत गावणंग, देवजी गोरिवले इत्यादी प्रमुख मंडळी उपस्थित होती. या प्रशिक्षण उपक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग व प्रशांत कदम यांनी उत्तम प्रकारे केले होते. Sky lanterns from bamboo
