गुहागर, ता. 12 : लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे “ऑटोकॅड अँड इन्व्हेंटर प्रोफेशनल सॉफ्टवेअर फॉर इंडस्ट्रिअल ॲप्लिकेशन्स” या कौशल्यविकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २६ जून ते ११ जुलै, २०२३ या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यशाळेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. Skill development workshop concluded in Gharda college
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. समीर गजमल यांनी प्रास्ताविक सादर केले. आपल्या भाषणात त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकवृंदाचे स्वागत केले तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी डिझाईन सॉफ्टवेअर संदर्भात प्राथमिक माहिती दिली तसेच भारतातील वेगाने वाढणाऱ्या डिझाईन क्षेत्राकडे लक्ष वेधले. मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेतील तज्ज्ञ प्राध्यापक डॉ. विकास खालकर आणि डॉ. समीर गजमल यांनी या संपूर्ण कार्यशाळेमध्ये विविध प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने प्रॉडक्ट डीझाईन, त्यासाठी आवश्यक ऑटोकॅड आणि इन्व्हेंटर सारखी सॉफ्टवेअर्स, या सॉफ्टवेअरची कार्यपद्धती आणि उपयुक्तता याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. Skill development workshop concluded in Gharda college
विद्यार्थ्यांनीही दररोज चालणाऱ्या या कृती सत्रांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. सदर कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रमोद पाटील आणि मेकॅनिकल शाखेचे विभागप्रमुख डॉ.बी.ए.दानवडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. Skill development workshop concluded in Gharda college