• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 July 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यात सर्वाधिक एकशिक्षकी शाळा रत्नागिरी जिल्ह्यात

by Mayuresh Patnakar
July 15, 2026
in Maharashtra
37 0
0
73
SHARES
208
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

यूडायस प्लस २०२५-२६ च्या जिल्हानिहाय आकडेवारीतून समोर

मुंबई, ता. 15 : राज्यातील शिक्षक भरतीचे दावे आणि शैक्षणिक सुधारणांच्या घोषणांदरम्यान दुर्गम भागातील शाळांचे वास्तव मात्र बदललेले नाही. कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही शेकडो शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरोशावर सुरू आहेत. यूडायस प्लस २०२५-२६ च्या जिल्हानिहाय आकडेवारीतून राज्यातील एकशिक्षकी शाळांचे असमतोल चित्र प्रथमच स्पष्टपणे समोर आले आहे. Single-teacher schools in Ratnagiri district

राज्यातील ९ हजार २७४ एकशिक्षकी शाळांपैकी ४ हजार ५८० शाळा या रत्नागिरी, रायगड, यवतमाळ, नागपूर, सातारा, पालघर, गडचिरोली आणि पुणे या अवघ्या आठ जिल्ह्यांमध्ये आहेत. राज्यातील ९ हजार २७४ एकशिक्षकी शाळांमध्ये १ लाख ७९ हजार ७१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रत्येक शाळेत एकाच शिक्षकावर अध्यापनासह मुख्याध्यापकांची जबाबदारी, प्रशासकीय कामकाज, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, ऑनलाइन माहिती भरणे, पालकांशी समन्वय अशा अनेक जबाबदाऱ्यांचा भार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Single-teacher schools in Ratnagiri district

गेल्या काही वर्षांत राज्यातील एकशिक्षकी शाळांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचेही युडायस प्लस अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०२४-२५ मध्ये अशा ८ हजार १५२ होत्या. अवघ्या एका वर्षात त्यात १ हजार १२२ शाळांची भर पडून ही संख्या ९ हजार २७४ वर पोहोचली आहे. त्यामुळे शिक्षक भरती आणि दुर्गम भागातील जिल्हानिहाय आकडेवारीत रत्नागिरी (७३९) राज्यात अव्वल असून, त्यापाठोपाठ रायगड (६३७), यवतमाळ (५८५), नागपूर (५३१), सातारा (५३०), पालघर (५२८), गडचिरोली (५२६) आणि पुणे (५०४) यांचा क्रम लागतो. राज्यात ५०० पेक्षा अधिक एकशिक्षकी शाळा असलेल्या आठ जिल्ह्यांपैकी तीन कोकणातील, तीन विदर्भातील आणि दोन पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे डोंगराळ, दुर्गम आणि विखुरलेल्या वस्तीच्या भागांमध्ये शिक्षक उपलब्धतेचा प्रश्न अधिक तीव्र असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. Single-teacher schools in Ratnagiri district

दुसरीकडे हिंगोली (२५), लातूर (४७), अकोला (५१), परभणी (५२), धाराशिव (५७), मुंबई शहर (५७), वाशीम (६३) आणि बीड (६५) या जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी एकशिक्षकी शाळा आहेत. मात्र, राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरात मिळून १७० एकशिक्षकी शाळा असल्याची नोंदही या युडायस अहवालात झाली आहे. त्यामुळे एकशिक्षकी शाळांचा प्रश्न केवळ ग्रामीण किंवा आदिवासी भागापुरता मर्यादित नसून महानगरांपर्यंतही त्याचे अस्तित्व कायम असल्याचे या आकडेवारीतून अधोरेखित झाले आहे. Single-teacher schools in Ratnagiri district

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSingle-teacher schools in Ratnagiri districtटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share29SendTweet18
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.