• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सिंह यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी पदभार स्विकारला

by Ganesh Dhanawade
October 2, 2022
in Ratnagiri
17 0
0
Singh accepted the post
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 02 : एम. देवेंदर सिंह यांनी आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. सिंह यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत करण्यात आले. Singh accepted the post

पुणे येथे असलेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणून देवेंदर सिंह कार्यरत होते. यांनी आयआयटी रुडकी येथून संगणक अभियांत्रिकी व नंतर एम.बी.ए केलेले आहे. आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत करण्यात आले. तर मावळते जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांची मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर नियुक्ती झाल्याने बदलून जात आहेत. पुणे येथे संचालक पदापूर्वी त्यांनी आधी अकोला आणि चंद्रपूर येथे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर यवतमाळ व बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील 2011 च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी दिल्ली येथे बँकिंग क्षेत्रात सेवा बजावलेली आहे. 5 वर्षांच्या या खाजगी क्षेत्रातील बँक सेवा कालावधीत रिझर्व बँक ऑफ इंडिया अशी त्यांच्या कामाचा निकटचा संबंध होता. Singh accepted the post

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSingh accepted the postUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.