निमित्त शिक्षक प्रबोधिनी व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन
गुहागर, ता. 23 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचलित श्रीसिध्दीविनायक विद्यामंदिर मुंढर येथे 25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त शिक्षक प्रबोधिनी व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा आज शुक्रवार दि. 23 रोजी सकाळी 10.30 वाजता संपन्न झाला. यावेळी शिक्षक प्रबोधिनीचे उद्घाटक प्रा. चंद्रशेखर गाडगीळ (निवृत्त प्रा. व विभाग प्रमुख सी.औ.इ.पी.) व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन श्री. सुरेंद्र वैद्य ( एक्झिक्युटिव व्हाईस प्रेसिडेंट अड बिझनेस हेड, गोदरेज एरोस्पेस) यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. Silver Jubilee of Mundhar Vidyamandir
या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून मा. श्री. हेमंतजी भागवत, (सेवानिवृत्त एअर चीफ मार्शल), सौ. सीमा यादव, (डायरेक्टर, जनशिक्षण संस्थान, रत्नागिरी), सौ. कीर्ती आगाशे (प्रा. परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वर), श्री. माधव मुसळे (सेवानिवृत्त जी. आय., आय. टी. आय. चिपळूण) यांची उपस्थित लाभली. Silver Jubilee of Mundhar Vidyamandir
या उद्घाटन सोहळ्यानंतर दु. 3 वाजता माजी विद्यार्थ्यांच्या क्रिडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. 24/12/2022 रोजी स. 10 ते 12 वा. माजी विद्यार्थ्यांचे मनोगत, दु. 12 ते 1.30 वा. फिशपॉण्ड, 1.30 ते. 2.30 स्नेह भोजन, 2.30 ते 4.30 कृतज्ञता सन्मान, सायं. 4.30 ते 5.30 समारोप व रात्रौ 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. Silver Jubilee of Mundhar Vidyamandir
तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, अशा विनंती माजी विद्यार्थी संघ, (श्रीसिध्दीविनायक विद्यामंदिर मुंढर), श्री. अनंत हणमंत साठे, मुख्याध्यापक, (श्रीसिध्दीविनायक विद्यामंदिर मुंढर) व अध्यक्ष डॉ. विनय श्रीधर नातू (डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान ) यांचेकडून करण्यात आली आहे. Silver Jubilee of Mundhar Vidyamandir

