कनार्टकचे मुख्यमंत्री बोम्माई यांचे प्रतिपादन
गुहागर, ता.11 : “लोक कल्याण हेच ध्येय मठांचे असले पाहिजे यासाठी देशभरातील विविध मठानी समाज उत्थानाचे भव्य कार्य करणाऱ्या सिद्धगिरी मठाचा (Siddhagiri Math) आदर्श अन्य मठांनी घेतला तर भारत देश नक्कीच गतवैभव प्राप्त करेल.” असे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री मा. बसवराज बोम्माई यांनी केले. ते सिद्धगिरी मठ येथे आयोजित ‘सह्रदयी संत समावेश’ संमेलनात केले. Siddhagiri Math is Innovative Centre
श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ, कणेरी, कोल्हापूर येथे सह्रदयी संत समावेश’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संत संमेलनाला शंकरारूढ स्वामीजी, आत्माराम स्वामीजी, पूज्य बाबू सिंग महाराज यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक व देशातील अन्य भागातून चारशे हून अधिक संत व मठाधिपती उपस्थित होते. तसेच सुमारे 25 हजार भक्तगण संत संमेलनात संतवाणी ऐकण्यासाठी उपस्थित होते. त्यामध्ये या संत कर्नाटक उत्तर प्रांतातील बेळगाव, हुबळी, धारवाड, यादगिर, बिजापूर, बागलकोट, बिदर, गुलबर्गा, रायचूर, गदग, कोप्पळ आदिभागातून दहा हजारहून अधिक भाविक आले होते. Siddhagiri Math is Innovative Centre
संमेलनाला राजकीय नेत्यांचीही उपस्थिती
या संत संमेलनाला संसदीय कामकाजमंत्री, भारत सरकार श्री. प्रल्हाद जोशी, कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्य व्ही. सोमन्ना (पायाभूत विकास मंत्री), गोविंद कारजोळ (लघु व मध्यम पाटबंधारे मंत्री), श्री.सी.सी. पाटील (सार्वजनिक बांधकाम मंत्री), मुरुगेश निराणी (लघु व मध्यम उद्योग मंत्री), शंकर पाटील मुनेनकोप्प (वस्त्रोद्योग व साखर मंत्री), शशिकला जोल्ले (धर्मादाय, हज व वक्फ मंत्री), खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार श्रीमंता पाटील, आमदार राघेवेंद्र पाटील, महाराष्ट्र सरकारमधील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, बी. एल. संतोष (राष्ट्रीय संघटना प्रधान कार्यदर्शी, भा.ज.पा. दिल्ली) आदी मान्यवर उपस्थित होते. Siddhagiri Math is Innovative Centre
Siddhagiri Math is Innovative Centre
बसवराज बोम्माई (Karnatak CM) म्हणाले की, कर्नाटक सरकार गो वंश रक्षणासाठी ‘पुण्यकोटी’ प्रकल्पांच्या अन्वये कार्य करत आहे. पण पुज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी लोकसहभागातून उभारलेली ही अभिनव गोशाळा तसेच मठाचे विविध उपक्रम हे एक दिपस्तंभा प्रमाणे काम करत आहेत. गोरक्षण, शेतकऱ्यांचे रक्षण कृषी, संस्काराचे रक्षण, भविष्याचे रक्षण करणारे एक अभिनव केंद्र म्हणजे सिद्धगिरी मठ आहे. गुरुतत्व हे महान तत्व आहे. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींजींचे कार्य महान आहे. ते पाहून त्यांच्या चरणी लीन व्हावे लागते. Siddhagiri Math is Innovative Centre
Siddhagiri Math : कर्नाटक भवनासाठी 5 कोटी देणार
लोकोपयोगी कार्य करणाऱ्या सिद्धगिरी मठाचे एक भव्य उपकेंद्र कर्नाटक राज्यात व्हावे. यासाठी कर्नाटक शासनामार्फत जमिनीसह आवश्यक ती मदत करण्यात येईल. तसेच सिद्धगिरी येथे बांधण्यात येणाऱ्या कर्नाटक भवनासाठी शासनामार्फत ३ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यात २ कोटींची आणखी मदत करण्यात येणार असल्याचे बोम्माई यांनी घोषित केले. Siddhagiri Math is Innovative Centre
Siddhagiri Math : Centre of social projects with spirituality
केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री (Union Parliamentary Affairs Minister) श्री. प्रल्हाद जोशी म्हणाले, “संत बसवेश्वरांनी ‘काम हेच कैलास’ हा मंत्र सांगितला आहे, पण या मंत्राचा पूर्ण अनुभव स्वामीजींच्या जीवनातून येतो. स्वामीजींच्या प्रकल्पांबाबत बोलताना पुढील ४ तासांचा वेळ ही पुरणार नाही, स्वामीजींनी सुरु केलेल्या प्रकल्पांची यादी खूप मोठी आहे. शिक्षण व्यवस्थेपासून ते कृषी,गोवंश, आध्यात्म, समाज, महिला उत्थान, आपत्कालीन मदत, पुनर्वसन, औषध निर्मिती, वैद्यकीय सेवा अशा असंख्य बाबींना स्पर्श करत एक आदर्शाचा मापदंड घालून दिला आहे. सिद्धगिरी मठ म्हणजे आध्यात्म आणि समाजोपयोगी प्रकल्पांचे एक केंद्र असून स्वामीजी सर्वांसाठी एक उर्जास्त्रोत आहेत.” Siddhagiri Math is Innovative Centre
Siddhagiri Math doing Preservation and promotion of culture श्री. बी. एल. संतोष (राष्ट्रीय संघटना प्रधान कार्यदर्शी, भा.ज.पा. दिल्ली) म्हणाले की, अनेक आक्रमणे आली पण आपली संस्कृती टिकली कारण आपल्या संस्कृतीसाठी घर, मठ, मंदिर हे पायाभूत घटक आहेत. यातूनच संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होत आले आहे. आज घरातील संस्कारापासून ते संस्कृतीच्या पुनरुत्थानापर्यंत स्वामीजींनी अभिनव कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचे भारतीय समाजावर ऋण राहतील. राज्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी जसे प्राचीन काळी संत होते तसे आज काडसिद्धेश्वर स्वामीजी आहेत. Siddhagiri Math is Innovative Centre