• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोतळूक येथे श्री हनूमान जन्मोत्सव

by Guhagar News
April 4, 2023
in Guhagar
123 1
0
Shri Hanuman Janmatsav at Kotaluk

कोतळूक उमदेवाडी हनूमान मंदिर

242
SHARES
690
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उमदेवाडी हनूमान मंदिर येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गुहागर ता. 04 : कोतळूक उमदेवाडी येथील प्रसिद्ध श्री हनूमान मंदिर येथे  जन्मोत्सवानिमित्त दि. 05 व 06 एप्रिल 2023 रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुश्राव्य भजन, नमन, कुंकुमार्चन, नाट्य कलाकृती आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. तरी या कार्यक्रमांसाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उमदेवाडी ग्रामस्थ मंडळ व उत्कर्ष महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. Shri Hanuman Janmatsav at Kotaluk

श्री हनूमान जन्मोत्सवानिमित्त बुधवार दि. 05 एप्रिल रोजी स. 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दु. 2 वा. स्थानिक भजन, दु. 3 ते 5 महिलांचे हळदीकुंकू, सायं. 7 ते 10 तिर्थप्रसाद, रात्रौ 8.30 वा, मळण येथील बुवा श्री. संदिप नाटुस्कर व पखवाज श्री. संदेश हुमणे यांचे स्वरसाधना संगीत भजन, रात्रौ  10.30 वा. श्री. सोमनागेश्वर नाट्य कला मंच तळवली लेखक व दिग्दर्शक श्री. अमित प्रविणा प्रमोद पोफळे यांचे ह्रदयस्पर्शी दोन अंकी नाट्य कलाकृती “कन्यादान” सादर करण्यात येणार आहे. Shri Hanuman Janmatsav at Kotaluk

गुरुवार दि. 06 एप्रिल रोजी सकाळी 5.15 वा. ह.भ.प.डॉ.श्री. श्रीपाद जोगळेकर हेदवी यांचे सुश्राव्य कीर्तन, स. 6.30 वा. श्रीं चा जन्मोत्सव सोहळा, दु. 3 वा. लकी ड्रॉ सोडत 2023, सायं. 4.30 वा. श्रीं ची पालखीतून सवाद्य मिरवणूक, रात्रौ 10 वा. गुणवंतांचा सत्कार, रात्रौ 10. 30 वा. श्री वाघजाई देवी नमन मंडळ, तुरळ धोंगडवाडी- तेलीवाडी, ता. संगमेश्वर यांचे बहुरंगी नमन सादर होणार आहे. Shri Hanuman Janmatsav at Kotaluk

तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उमदेवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष समीर ओक,  व उत्कर्ष महिला मंडळ अध्यक्ष सौ. श्रद्धा बागकर यांनी केले आहे. Shri Hanuman Janmatsav at Kotaluk

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShri Hanuman Janmatsav at KotalukUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share97SendTweet61
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.