गुहागर वरचापाट श्री नरनारायण देवस्थान तर्फे आयोजन
गुहागर, ता.03 : वरचापाट येथील श्री नर नारायण देवस्थानच्या वतीने श्री नर नारायण महोत्सवनिमित्त (११६ वा वर्धापनदिन) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री नर नारायण प्रासादिक मंडळ गुहागर वरचापाट यांनी केले आहे. Shree Narnarayan Festival at Varchapat

या महोत्सवनिमित्त मंगळवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वा. काकड आरती, सकाळी ८ वा. श्रींची षोडशोपचारी पूजा व आरती, दुपारी १२.३० वा. ग्रंथ पारायण, आरती व महाप्रसाद, सायं. ५.३० वा. श्री पिंपळादेवी महिला मंडळीचे सुश्राव्य भजन, सायं. ७ वा. सिद्धकला भजन मंडळाचे सुश्राव्य भजन, रात्री १० वा. सुश्राव्य संगीत भजने. बुधवार दि. ५ एप्रिल रोजी सायं. ४ वा. श्री नर नारायण पालखी सुश्राव्य संगीत भजने सोहळा. गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. श्रीहनुमान जन्म सोहळा, सायं. ४ वा. श्री हनुमान पालखी सोहळा. शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वा. महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. Shree Narnarayan Festival at Varchapat
तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री नर नारायण प्रासादिक मंडळ गुहागर वरचापाट यांनी केले आहे. Shree Narnarayan Festival at Varchapat
