गुहागर, ता. 28 : महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या खेलो इंडिया जुदो स्पर्धेसाठी गुहागरची श्रद्धा अनिल चाळके हिची निवड झाली आहे. या स्पर्धा दि. 3 ते 4 जानेवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बालेवाडी पुणे येथे घेण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात श्रद्धा चाळके हिचा सत्कार करण्यात आला. Shraddha Chalke selected for Khelo India Judo
हा सत्कार गुहागर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे, जुदो संघटनेचे सल्लागार श्री. सुहास हळदणकर यांच्या हस्ते श्रद्धा हीला पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी या सत्कार सोहळ्यासाठी जिल्हाध्यक्ष निलेश गोयथळे, तालुका अध्यक्ष सोनाली वरंडे, प्रशिक्षक रूतिकेश झगडे, अर्चीता सुर्वे आदी उपस्थित होते. Shraddha Chalke selected for Khelo India Judo
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2022/12/add-4-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2022/12/add-4-1.jpg)