संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील खोडदे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन, दीपप्रज्वलन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक महत्वपूर्ण कार्याबद्दल भाषणे, पोवाडे आणि गाणी सादर केली. Shivjanmatsava celebration at Khodde school


यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश केशव साळवी, राजेंद्र पंढरीनाथ साळवी यांनी शाळेला रंगमंचावरील पडदे देणार असे जाहीर केले. यावेळी सरपंच कु. पुजा गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदेश साळवी, शिक्षणतज्ञ विलास गुरव, माजी पोलिस पाटील रमाकांत साळवी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश केशव साळवी, राजेंद्र पंढरीनाथ साळवी, विनायक गुरव, संतोष गुरव, शहानंद पवार, मुख्याध्यापिका प्रिता गावड, उपशिक्षिका संध्या पाटील, आदी. मान्यवर उपस्थित होते. या शिवजयंती, शिवजन्मोत्सव कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदेश साळवी यांनी सर्वांचे आभार मानले. Shivjanmatsava celebration at Khodde school