• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुस्लीम समाजाने जपली सामाजिक बांधिलकी

by Ganesh Dhanawade
February 20, 2023
in Guhagar
164 2
0
Shivjanmatsava celebration at Gopalgad
323
SHARES
922
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागरातील शिवजयंती मिरवणुकीत सहभाग; महिला बचत गटांचा लक्षणीय सहभाग

गुहागर, ता. 20 : जिल्ह्यात नेहमीच शांत तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर तालुक्यातील हिंदू- मुस्लिम समाजामधील जातीय सलोखा सर्वांचं माहीत आहे. वर्षात येणारे सर्वच सण एकत्रितपणे साजरे करण्याची परंपरा हिंदू- मुस्लीम समाजाने जपली आहे. त्याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे काल झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवात सर्वांना पहावयास मिळाले. शृंगारतळी व गुहागरमध्ये शिवरथाचे मुस्लिम बांधव व भगिनी यांनी स्वागत केले. सकाळी सुरू झालेली शिव यात्रेचे सायंकाळी 5 वाजता अंजनवेल येथील गोपाळगडावर भगवे ध्वज फडकावून समारोप करण्यात आला. Shivjanmatsava celebration at Gopalgad

Shivjanmatsava celebration at Gopalgad

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम शीवभक्त गुहागरवासीय यांच्यावतीने शिवजयंतीनिमित्त शिव पादुकांच्या रथाची शृंगारतळी जानवळे फाटा ते अंजनवेल येथील किल्ले गोपाळगडावर रॅली काढण्यात आली. असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखीतून रॅली काढण्यात आली. या रॅलीसाठी आकर्षक शिवरथ तयार करण्यात आला होता. शिवरथ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. Shivjanmatsava celebration at Gopalgad

Shivjanmatsava celebration at Gopalgad

मुस्लिम बांधवांनी शृंगारतळी बाजारपेठेत शिवरथा मधील शिवपादुकांना पुष्पहार घालून मिरवणुकीतील शिवप्रेमींना गळाभेट करून त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर रॅलीमधील शिवप्रेमींना पाणी, थंडपेये, बिस्किटे यांचे वाटप केले. निळकंठेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी शिव यात्रेत मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. शिवाजी चौक येथे शहरातील ग्रामस्थ व बचत गटांच्या महिलांनी जोरदार स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय…, जय भवानी जय शिवाजी.., च्या घोषणा देण्यात आल्या. Shivjanmatsava celebration at Gopalgad

Shivjanmatsava celebration at Gopalgad

यावेळी खास पालघर वाडा येथून आलेले कुलदीप दिवटे यांनी छ. शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली होती. घोड्यावरून रुबाबात महाराजांची शिव यात्रा चालली होती. श्री देव व्याडेश्र्वर मंदिर, व्याघ्रांबरी मंदिर, दुर्गादेवी मंदिरामध्ये शिव पादुकांचे पूजन करण्यात आले. गुहागर तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी यात्रेचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य गीत म्हणण्यात आले. Shivjanmatsava celebration at Gopalgad

Shivjanmatsava celebration at Gopalgad

वरचापाट मुस्लिम मोहल्ल्यातील महिलांनीहि रॅलीचे पुष्पवृष्टीने स्वागत करून जय भवानी जय शिवाजी..घोषणा दिल्या. शिव यात्रेत सक्रिय सहभाग घेत मुस्लिम समाजाने हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले. सायंकाळी 5.30 वाजता अंजनवेल गोपाळगड किल्ल्यावर छ. शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारलेले कुलदीप दिवटे यांच्या हस्ते भगवा ध्वजा फडकवण्यात आला. त्याआधी किल्ल्यावर शृंगारतळी येथील लिटिल चॅम्प्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महराजांच्या जीवनावरील गीतांवर नृत्य कवायती करत सादर केले. सर्व शिवप्रेमींना अंजनवेल ग्रामस्थांच्या वतीने जेवण देण्यात आले. या शिव यात्रेत तालुक्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते. Shivjanmatsava celebration at Gopalgad

Shivjanmatsava celebration at Gopalgad
Shivjanmatsava celebration at Gopalgad
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShivjanmatsava celebration at GopalgadUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share129SendTweet81
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.