• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

by Ganesh Dhanawade
February 17, 2023
in Guhagar
122 2
0
Shivjanmatsava celebration at Gopalgad
240
SHARES
687
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गोपाळगडावर फडकविणार भगवा ध्वज; शृंगारतळी ते अंजनवेल शिवयात्रा

गुहागर, ता. 17 :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम गुहागरवासीय यांच्यावतीने दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने भव्य शिव पादुकांच्या रथाचे आयोजन करण्यात आले आहे. Shivjanmatsava celebration at Gopalgad

शृंगारतळी जानवळे फाटा येथून मोठ्या दिमाखात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखीतून शिव यात्रा काढण्यात येणार आहे. गुहागरमधून अंजनवेल येथील किल्ले गोपाळगड येथे पादुका पूजन व ध्वजारोहन होणार आहे. दरम्यान, यानिमित्ताने उद्या शनिवारी सायंकाळी अंजनवेल येथून शिव पादुकांचे श्री नीलकंटेश्वर मंदिरात आगमन होणार आहे. Shivjanmatsava celebration at Gopalgad

Shivjanmatsava celebration at Gopalgad

रविवारी श्री नीलकंटेश्वर मंदिरात सकाळी 8.30 वाजता शिवपादुकांचे पूजन, 9 वा. जानवले फाटा येथून पालखी सोहळा प्रारंभ, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांची भव्य शिवरथ यात्रा गुहागरकडे प्रस्थान, दु. 11.30 वा. गुहागर शिवाजी चौक येथे आगमन, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुढे पालखी श्री देव व्याडेश्वर मंदिरात शंभू महादेव व ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी मंदिरात भेटीला जाईल. तेथून दुपारी 12 वाजता वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आगमन होईल. याठिकाणी पादुकांचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोघोषात पूजन व जगदंबेची भेट होईल. यावेळी गुहागर बाजारपेठ व वरचापाट, मोहल्ला, बाग याठिकाणी पादुकांचे पूजन केले जाणार आहे. 12.30 वा. शिवरथ किल्ले गोपाळगडाकडे प्रस्थान करणार आहे. 1 वाजता अंजनवेल गोपाळगडावर शिवरथ व पालखीचे आगमन होईल. त्यानंतर पादुकांचे पूजन होऊन गडावर भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. या शिव जन्मोत्सव सोहळ्यासाठी तालुक्यातील असंख्य शिवभक्त व गुहागरवासीय उपस्थित राहणार आहेत. Shivjanmatsava celebration at Gopalgad

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाने १६ व्या शतकात बांधला. इ.स. १६६० मध्ये शिवछत्रपतींनी तो जिंकला. शिवाजी महाराजांच्या मृत्यनंतर मोगल आक्रमणाच्या धामधुमीचा फायदा घेऊन सिद्दी खैरातखानने तो इ.स. १६९९ मध्ये जिंकला. त्यानंतर इ.स. १७४४ मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत तो सिद्दीच्याच ताब्यात राहिला. या काळात सिद्दीने किल्ल्याचा विस्तार करुन त्यात सुधारणा केल्या. तर नंतर तुळाजी आंग्रेनेही त्याचा विस्तार केला. इ.स. १८१८ रोजी कर्नल केनडी याने किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तो ब्रिटीशांच्याच ताब्यात होता. तर प्रश्न राहतो या किल्ल्याला गोपाळगड नाव कसे पडले? आपणास माहिती असेल तुळाजी आंग्रे हे कृष्णभक्त होते. त्यांनी जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा याचे नाव गोपाळगड करण्यात आले. या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवतेज फाऊंडेशन, गुहागर व समस्त गुहागर वासीयांनी पुढाकार घेतला आहे. Shivjanmatsava celebration at Gopalgad

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShivjanmatsava celebration at GopalgadUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.