गुहागर, ता. 18 : शिवाज्ञा फाऊंडेशन तर्फे राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या स्मृतीदिनी प्राथमिक शाळा तिवरे नं१, व प्राथमिक शाळा रिक्टोली-गावठण येथे दि. १७ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षांनिमित्त विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आली. Shivajna Foundation gifts umbrellas to students

महाराष्ट्रातील जनतेच्या मस्तकावर चारशे वर्षापूर्वी ज्या माऊलीने मायेचे छत्र धरले त्या राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना आज ही छोठीशी मानवंदना देत आहोत, असे श्री.ओम गंगावणे यानी नमुद करत आम्हाला ह्याकामी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचे आभार व्यक्त केले. Shivajna Foundation gifts umbrellas to students

यावेळी शिवाज्ञा फाऊंडेशनचे संघराज जाधव, निरंजन पाकळे, साईराज सुर्वे, ओम गंगावणे, सुश्मिता मोरे, नेहा पालशेतकर, स्नेहा मालप, अक्षता जोशी, नेहा घाडे, साक्षी मेटकरी, आदिष्टी पाकळे तसेच गावातील दानशूर व्यक्तिमत्त्व श्री.सखाराम तिवरेकर तसेच शाळेचे शिक्षकवृंद श्री राजेश केरुशेट लकेश्री सर आणि सौ. निलम किशोर मोहिते मॅडम, (रिक्टोली-गावठण शाळा)श्री.प्रकाश रामचंद्र पेंढारकर आणि सहकारी वृंद (तिवरे शाळा ) सौ. मानसी मंगेश म्हैसकर अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती सौ. सोनाली नामदेव शिंदे उपाध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती श्री अरविंद पुतळाजी शिंदे सौ मीनाक्षी अमृत शिंदे सौ प्रतिभा संदीप शिंदे श्रीमती सिमा श्रीधर शिंदे उपस्थित होत्या. Shivajna Foundation gifts umbrellas to students
