88 व्या “त्रिमूर्ती महाशिवरात्री निमित्त” प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय सेंटर तर्फे आयोजन
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय सेंटरच्यावतीने 88 व्या “त्रिमूर्ती महाशिवरात्री निमित्त” “शिव ध्वजारोहण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Shiva flag hoisting at Guhagar
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी,आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपल्या मनशांतीसाठी अशा इन्स्टिटेशन्समध्ये भाग घेणे खूप गरजेचे आहे कारण मन शांत करण्यासाठी मेडिटेशन ची गरज आहे असे सांगितले. त्याचबरोबर कला बहेनजी व शुभांगी बहेनजी या दोघींनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी केले. Shiva flag hoisting at Guhagar
या कार्यक्रमाला जीवनश्री प्रतिष्ठान व लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष वरंडे, उपाध्यक्ष विनायक जाधव, साळवी कॉम्प्लेक्स चे मालक अवधूत साळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष शामकांत खातू, सिद्धकला कंट्रक्शन नितीन बेंडल व राशिनकर सर तसेच ब्रह्माकुमारी विद्यालयाचे भाऊ बहिणी व सेंटरच्या शुभांगी बहेरनजी यांच्या उपस्थितीमध्ये महाशिवरात्री कार्यक्रम संपन्न झाला. Shiva flag hoisting at Guhagar