गुहागर ता. 01 : शिवस्वराज्य प्रतिष्ठान संघटनेचा सातवा वर्धापन दिन दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी नूतन विद्यालय नालासोपारा येथे साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचेऔचित्य साधून दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा पार पडला. Shiv Swarajya Pratishthan Anniversary


घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक श्री ज्ञानेश्वर मांडवकर, द्वितीय पारितोषिक श्री प्रकाश जी कुळे तर तृतीय पारितोषिक कु. शुभम शंकर धनावडे यांना देण्यात आले. तसेच सहभागी झालेले सर्व मंडळींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच शिवस्वराज्य प्रतिष्ठान 2024 संघटनेचा मावळा पुरस्कार श्री एकनाथ डिंगणकर, श्री रमेश आंबेकर, श्री दिनेश पंडये, श्री भावेश बाईत यांना देवून गौरविण्यात आले. सर्व शिलेदारांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष संस्थापक श्री विलास सुवरे यांना मावळा पुरस्कार देऊन परिवार सोबत गौरवण्यात आला. Shiv Swarajya Pratishthan Anniversary


या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी दिनेश जी शिंदे, संजीवनी हॉस्पिटलचे अधिकारी तुकाराम जी पास्टे, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे श्री अनंतजी फिलसे, कुणबी विभाग शाखा विरारचे अध्यक्ष श्री किशोरजी भेरे, सुप्रिया ट्रॅव्हल चे मालक श्री बाळकृष्ण मस्कर, शिवसेना शहरप्रमुख विरार चे सन्माननीय श्री उदय दादा जाधव, पत्रकार श्री दिपक जी मांडवकर, समाजसेवक श्री भास्कर जी पवार, सन्माननीय प्रकाशजी कुळे, चंद्रकांत बाईक, जितेंद्र चव्हाण प्रमुख पाहुणे उपस्थित होते.


तसेच संघटनेचे सह उपस्थित मान्यवर विकास पाडावे, राजेश येद्रे, अनिल माटल, स्वरूप सुवरे, नरेश येद्रे, सचिन कुलये, ओमकार घवाळी, एकनाथ डिंगणकर, सुनील रेवाळे, शैलेश बामणे, सचिन कुळे, प्रणव सुवरे, शुभम घवाळी, सौ विनिता सुवरे, सौ स्नेहा वेद्रे, मयुरी वेद्रे, वैभवी आंबेकर, वैष्णवी आंबेकर, संघटनेचे अध्यक्ष श्री विलास सुवरे यांनी संघटनेचे महत्त्व व ध्येय बद्दल माहिती दिली. संघटनेचे सचिव राजेश वाळंज यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संघटनेचे सल्लागार महेश पाडावे, हरेश आंबेकर, चेतन काजारे, दिलीप दवंडे, रुपेश सुवरे, देवेंद्र नवरत, अजित वेद्रे , भावेश भाईत, शशांक गावनंग, दिनेश पंडये, सुरेश मोहिते, प्रमोद धुमाळ, व इतर मान्यवर आणि संघटनेचे शिलेदारान यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. Shiv Swarajya Pratishthan Anniversary