शिवसेनेच्या विपुल कदम यांची प्रतिक्रिया
गुहागर, ता. 07 : मी संघटना वाढीसाठी, गुहागरच्या शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आलो आहे. येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. नवीन शाखेच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न सोडवणार आहोत. तसेच या ठिकाणी नवनवीन डेव्हलपमेंट कशी होईल. यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. शिवसेनेचा सर्वसामान्य चेहरा कोण असेल हे विचारले असता, हा सर्वस्वी निर्णय वरिष्ठांचा असल्याचे गुहागर विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या विपुल कदम यांनी संगितले. Shiv Sena office inaugurated at Sringaratali
शृंगारतळी येथे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन जेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, संतोष आग्रे, अमरदीप परचुरे, रोहन भोसले, गुहागर शहराध्यक्ष निलेश मोरे, प्रल्हाद विचारे, श्री. तावडे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Shiv Sena office inaugurated at Sringaratali
यावेळी विपुल कदम म्हणाले की, गुहागर विधानसभेमध्ये सर्वसामान्यांचा चेहरा कोण असेल हा निर्णय वरिष्ठ घेतील. मी निवडणूक लढवावी ही माझ्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा असू शकते. परंतु, मी संघटना वाढीसाठी खूप काम करणार आहे. येथील संघटनेला बळ देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. अजूनही काही शाखा आम्ही गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये उघडणार असून शाखेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार करू, असे सांगितले. Shiv Sena office inaugurated at Sringaratali
पत्रकारांनी गुहागरच्या उमेदवारीबाबत विचारले असता, मी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे बघू नका. इथल्या उमेदवारीचा सर्वस्वी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीच्या घटक पक्षांचा आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे श्री. कदम म्हणाले. दरम्यान, विपुल कदम यांच्या गुहागर दौऱ्याने इथल्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. Shiv Sena office inaugurated at Sringaratali