छत्रपती शासन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत आयोजन
गुहागर, ता. 21 : छत्रपती शासन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत छ. शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे शिवज्योत दौड गोणवली – पोमेंडी गावामधून सुरू करून शृंगारतळी – गुहागर मार्गे- अंजनवेल गोपाळगडावर नेण्यात आली. यावेळी गोपाळगडाच्या पश्चिम बुरुजावर महाराजाच्या मूर्तीवर दुग्ध अभिषेक करून महाराज्यांना मानवंदना देऊन जयघोष करत जयंती साजरी करण्यात आली. Shiv Jyot Daud on the occasion of Shiv Jayanti


ह्या शिवज्योत दौड कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील खेडेगावातील युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच अंजनवेल गावातील शिवकन्या ग्रुप सुद्धा ह्यामध्ये सामील झाल्या होत्या. या कार्यक्रमाला छत्रपती शासन संघटना महाराष्ट्र राज्य, संस्थापक, प्रमुखसदस्य रुपेश वीर, महेश जाधव, अक्षय रांगळे, उमेश पाडावे, नितेश रांगळे, पाटपन्हाळे कॉलेजचे राज धोपट उपस्थित होते. Shiv Jyot Daud on the occasion of Shiv Jayanti

